कोकण

-आहाराकडे पाहू डोळसपणे

CD

पाक-पोषण .........लोगो
26O15107 लोगो

आहाराकडे पाहू डोळसपणे

रेशनच्या माध्यमातून अन्न गरिबांपर्यंत फुकट पोहोचते. यातून अन्नसुरक्षा मिळत असली तरी पोषणसुरक्षा मिळत नाही. त्यामुळे शहरी, ग्रामीण आणि आदिवासी अशा सर्व क्षेत्रांतील लहान मुले, महिला आणि युवक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. अशा समाजाला हवामान-संवेदनशील रोगांचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो तसेच हवामान बदल आणि त्यामुळे येणाऱ्या आपत्तींमध्ये सहज बळी पडू शकतो. हे लक्षात घेऊन आवश्यकता आहे ते आपल्याच आजूबाजूला असलेल्या पौष्टिक खाद्यपदार्थांना आपल्या ताटात नव्याने जागा करून देण्याची. नवीन वर्षापासून सुरुवात करूया आहाराकडे एक डोळस दृष्टिकोनातून पाहण्याची आणि नावीन्यपूर्ण पाककृतींनी आपले आरोग्य जपण्याची!
- rat२p५.jpg -
26O15059
- संगीता खरात
सहसंचालिका, सृष्टीज्ञान संस्था
----
हवामान बदलाचा सर्वांत जास्त परिणाम होतो तो अर्थात आपल्या आरोग्यावर! नवीन वर्षाच्या पहाटे झालेल्या पावसाने हे संकट यापुढे किती गडद होत जाणार आहे, याची चुणूक दाखवून दिली आहे. हवामान बदलाचा आरोग्यावर होणारा परिणाम पाहता शहरी आणि ग्रामीण समाज सक्षम करण्यासाठी हवामानपूरक सकस आणि स्थानिक आहारविषयक जागृती करणे आवश्यक आहे. सर्व लोकांना पौष्टिक अन्न सहज परवडेल, अशा दरात सहज उपलब्ध असणे ही सुदृढ समाजाची गरज आहे. त्याचप्रमाणे बदलत्या हवामानात उगवून येईल, ताकद देईल आणि रोगप्रतिकरक शक्ती वाढवेल असा आहार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या आहारात विविधता हवी.
ऐंशीच्या दशकात आलेल्या हरितक्रांतीनंतर अन्नधान्य उत्पादन मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती आणि संकरित बियाणी वापरून केले जाते. यात मुख्यत: मका, भात, गहूसारखी पिके घेतली जातात; मात्र या एकसुरी शेतीमुळे आहारातील विविधता कमी झाली आहे. सतत रासायनिक खते, कीटकनाशके आणि बुरशीनाशके वापरल्याने अन्नातील सूक्ष्म पोषकतत्त्वांची कमतरता वाढत आहे.
आहारात स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली विविध धान्ये-भाज्या-फळे यांचा समावेश असावा. ज्वारी-बाजरी-वरी-नाचणीसारखी आदिम धान्ये, परसात उगवलेला सेंद्रिय पद्धतीने उगवलेला भाजीपाला, कंद, रानभाज्या, रानमेवा, विविध प्रकारच्या कोशिंबिरी, तुळस-अडुळसा-कोरफडसारख्या औषधी वनस्पती हे तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग बनायला हवेत. त्यापासून तयार होणाऱ्या पारंपरिक आणि नावीन्यपूर्ण पाककृतींना आपल्या आहारशैलीमध्ये सामावून घ्यायला हवे. या खाद्यपदार्थांमध्ये असलेली पोषणमुल्ये आणि त्याच्या करावयाच्या पाककृतीसंबंधी पूर्ण माहिती देण्यासाठी सृष्टीज्ञान संस्था ‘हवामानपूरक सकस आहार अभियान’ राबवत आहे.
सृष्टीज्ञान ही संस्था गेली पंचवीस वर्षे पर्यावरण शिक्षणक्षेत्रात कार्यरत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रम राबवत आहे. शाळा, महाविद्यालये, शेतकरी, महिला, शासकीय तसेच स्वयंसेवी संस्था यांच्याबरोबर सध्याची पर्यावरणीय ज्वलंत समस्या ‘हवामान बदल’ या विषयावर मोठ्या प्रमाणावर जाणीवजागृती करण्याचे काम करत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी क्लायमेट अॅंम्बेसॅडर्स, शेतकऱ्यांसाठी आदिम बियाणी संवर्धन कार्यक्रम, महिलांसाठी मिलेट मॉमस् क्लब, जैवविविधता संवर्धनासाठी धनेश मित्रमंडळयासारखे विविध प्रकल्प राबवले जात आहेत.
शहरी आणि ग्रामीण भागातील आहार गेल्या ५० वर्षात वेगाने बदलला आहे. निरोगी आयुष्याकडे घेऊन जाणाऱ्या सकस आहाराकडे दुर्लक्ष होऊन बाजारातील सत्त्वहीन, साखर आणि चरबीयुक्त आहार घेतला जात आहे. आपला पारंपरिक आहार काही पारंपरिक पदार्थ पुढील पिढ्यांकडे हस्तांतरित न झाल्यामुळे ते हरवले आहे. या लेखमालेमधून या सर्व अन्नधान्यांमधील पोषक तत्त्वे, त्यांचे शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम, त्यांच्या पाककृती, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आपण जाणून घेऊया.


(लेखिका भारतीय पारंपरिक आहार संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avian Influenza: देशात एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरसची एन्ट्री! चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी; 'हे' नियम पाळले नाहीत तर मोठा धोका

ती मला भेटायला का नाही आली? घराला कुलूप, अचानक झाली गायब; रजनीकांत यांचं ते प्रेम ज्याचा घाव आजही ताजा आहे

Pune Traffic Police : नववर्षाच्या रात्री पुण्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर धडक कारवाई; २०८ मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे!

Government Decision on Gig Workers : ‘गिग वर्कर्स’बाबत सरकारचा मोठा निर्णय! ‘Social Security Cover’सह बरच काही मिळणार मात्र...

Junnar Migratory Bird : युरोपातून येणाऱ्या रेड क्रेस्टेड पोचार्डची जुन्नर तालुक्यात प्रथमच नोंद; जैवविविधतेसाठी ऐतिहासिक क्षण!

SCROLL FOR NEXT