कोकण

रत्नागिरी-आठ दिवसात उत्तर न दिल्यास साखळी उपोषण

CD

rat2p12.jpg-
15119
रत्नागिरी ः कम्युनिटी सेंटर रद्द करण्याबाबत थिबा राजा संघर्ष समितीने निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन दिले. या वेळी एल. व्ही. पवार, किशोर पवार, अमोल जाधव, सुनील आंबुलकर, दीपक जाधव, प्रकाश पवार आदी उपस्थित होते.
--------------

आठ दिवसात उत्तर न दिल्यास साखळी उपोषण
थिबाराजा संघर्ष समितीचा इशारा ; कम्युनिटी सेंटरचे बांधकाम तत्काळ रद्द करा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : थिबा राजाकालीन बुद्धविहारासाठी आरक्षित असलेल्या १७.५० गुंठे जागेवर सुरू असलेले कम्युनिटी सेंटरचे बांधकाम तत्काळ रद्द करण्यात यावे, तसेच ही संपूर्ण आरक्षित जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावी, या दोन मुख्य मागण्या होत्या. मात्र निवेदन देऊनही दोन महिने उलटून गेले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही लेखी कार्यवाही अथवा उत्तर संघर्ष समितीला मिळालेले नाही. आठ दिवसांत निर्णय न झाल्यास प्रजासत्ताक दिनी साखळी उपोषणाचा इशारा थिबाराजा संघर्ष समितीने दिला आहे.
थिबा राजाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वी २७ ऑक्टोबर २०२५ ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाद्वारे दोन प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. थिबा राजाकालीन बुद्धविहारासाठी आरक्षित असलेल्या १७.५० गुंठे जागेवर सुरू असलेले कम्युनिटी सेंटरचे बांधकाम तत्काळ रद्द करण्यात यावे, तसेच ही संपूर्ण आरक्षित जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावी, या दोन मुख्य मागण्या होत्या. मात्र त्याला दोन महिने झाले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनावर नेमकी काय कार्यवाही करण्यात आली, याबाबत विचारणा केली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसांच्या आत माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात एल. व्ही. पवार, किशोर पवार, अमोल जाधव, सुनील आंबुलकर, दीपक जाधव, प्रकाश पवार, राजेंद्र कांबळे, अजित जाधव, प्रदीप पवार, तुषार जाधव, मिलिंद सावंत, राजन जाधव, शिवराम कदम आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

Farmer News: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या विशेष कृती दलासोबत शेतकरी कृती समितीचे एसबी पाटील यांची चर्चा

Pune Crime: बायकोचा छळ टोकाला! नवऱ्याने चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; पुण्यात धक्कादायक घटना

Investment Fraud Case : फसवणुकीचा धक्कादायक प्रकार : ५२ गुंतवणूकदारांना १.५९ कोटींचा फटका!

Pachod News : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या युवकाचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT