कोकण

पावस बाजारपेठेतील रस्याचे कॉक्रिटीकरण

CD

-rat२p१५.jpg-
P२६O१५१५७
पावस ः बाजारपेठेतील रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
---
पावस बाजारपेठेतील रस्त्याचे काँक्रिटीकरण
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २ ः पावस बाजारपेठ मार्गावरती सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दरवर्षी करावा लागणारा खड्ड्याचा सामना यावर्षीपासून दूर होणार असल्याने वाहनचालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पावस बाजारपेठेत मार्ग अरुंद व गटारांचा अभाव असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्ग काढण्यात आला; परंतु बाजारपेठ मार्गावरील खड्ड्यांची समस्या दरवर्षी वाढतच गेली. अरुंद रस्ता व रस्त्याच्या दुतर्फा गटारे नसल्यामुळे दरवर्षी रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढते. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी बाजारपेठेतील नागरिकांनी केली होती. त्यामुळे येथील रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात येणार आहे.
या संदर्भात बाजारपेठेतील ग्रामस्थ अश्रफ कप्तान म्हणाले, या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांच्या खड्ड्यांच्या समस्येबाबत अडीअडचणी दूर होणार आहेत; मात्र अरुंद रस्त्यामुळे गटाराची सुविधा नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये वाहून जाणाऱ्या रस्त्यावरील पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: बायकोचा छळ टोकाला! नवऱ्याने चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; पुण्यात धक्कादायक घटना

Investment Fraud Case : फसवणुकीचा धक्कादायक प्रकार : ५२ गुंतवणूकदारांना १.५९ कोटींचा फटका!

Pachod News : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या युवकाचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

Rohit Sharma: मुंबईत राहायचं म्हणजे मराठी बोलता आलंच पाहिजे... हिटमॅनच्या मराठी नाटकाच्या कलाकारांशी गप्पा

Latest Marathi News Live Update : ईडीची मुंबई आणि रायगडमध्ये मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT