कोकण

भाजप नगरसेवकांचा रत्नागिरीत सन्मान

CD

-rat२p२०.jpg-
P२६O१५१८९
रत्नागिरी : जिल्ह्यातील भाजप नगराध्यक्ष, नगरसेवकांचा सत्कार भाजप जिल्हा संपर्क कार्यालयात करण्यात आला. या वेळी मागे उभे डावीकडून वैभव खेडेकर, डॉ. विनय नातू, सचिन वहाळकर, वर्षा ढेकणे, दादा ढेकणे आदी.
----
भाजपच्या नगरसेवकांचा सन्मान
महिला मोर्चाच्या पुढाकार ; जिल्हा कार्यालयात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्या पुढाकाराने नगरपालिका निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या भाजप नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार जिल्हा कार्यालयात करण्यात आला. या समारंभात रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण मधील खेड, चिपळूण, गुहागर, देवरूख, लांजा, राजापूर व रत्नागिरी येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या यशाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, भाजप महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, सचिन वहाळकर शहर संयोजक, शहराध्यक्ष दादा ढेकणे व महिला शहराध्यक्ष भक्ती दळी आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी ढेकणे यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेच्या विश्वासावर भाजपने मिळवलेले यश हे संघटनेच्या सातत्यपूर्ण कार्याचे फलित आहे. सर्व नगराध्यक्ष व नगरसेवकांनी जनतेच्या अपेक्षांना न्याय देत विकासाभिमुख कामकाज करावे, असे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीची वाटचाल अशीच अधिक बळकट होत पुढे जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पक्षनेतृत्वाचे आभार मानत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याचे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT