कोकण

जलजीवनच्या ६० टक्के योजना आर्थिकदृष्ट्या अडचणीत

CD

‘जलजीवन’च्या ६० टक्के योजना अडचणीत
केंद्र निधी न मिळाल्याने कामांना ब्रेक ; जिल्ह्यात आतापर्यंत ६०८.४६ कोटींचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत एकूण १ हजार ४३२ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ७७२ योजना पूर्ण झाल्या असून, एकूण ४०.०६ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात ६५० पेक्षा जास्त योजनांची कामे ५० टक्क्यांहून पुढे गेली आहेत. आतापर्यंत या योजनेवर सुमारे ६०८.४६ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पाण्याची वर्षानुवर्षाची समस्या सोडवण्याच्या दिशेने हा मोठा पर्याय मानला जात आहे; परंतु केंद्र शासनाकडून आर्थिक सहाय्य न मिळाल्याने उर्वरित ६० टक्के योजना अडचणीत आल्या आहेत.
केंद्र व राज्यशासनाने प्रत्येकी ५० टक्के आर्थिक सहभागातून या योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण, नवीन स्रोतांचा शोध, जुन्या योजनांचे नूतनीकरण व सुधारणा करत थेट घराघरांत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवला जात आहे. या योजनांमुळे केवळ नळजोडणीच नव्हे तर त्यांना नियमित व पुरेसे पाणी येईल, याचीही दक्षता घेण्यात आली आहे.
२०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीत ११४२.८८ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. यामधील ३१३ योजनांची कामे ७५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाली आहेत. ३२६ योजनांची कामे ५० टक्क्यांहून अधिक प्रगतीवर आहेत. काही योजनांमध्ये भौगोलिक अडचणी व तांत्रिक कारणांमुळे कामांचा वेग कमी असला तरी बहुतांश योजना वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत; परंतु या कामाला निधीचा मोठा खो मिळाला आहे. केंद्र शासनाकडून ५० टक्के अनुदान न मिळाल्याने आणि राज्यानेही तेवढाच वाटा न दिल्याने उर्वरित ६० टक्के पाणीयोजनेचे काम रखडले आहे.
----
चौकट
साडेचार लाख कुटुंबांना नळाद्वारे देणार पाणी
जलजीवन मिशनअंतर्गत ५५९ गावांना हर घर जल घोषित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या नोंदीनुसार, जिल्ह्यातील ४ लाख ४८ हजार १६१ पैकी ३ लाख ७८ हजार १९१ कुटुंबापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचले आहे. २०२६ अखेर ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित व पुरेसे पाणी घरगुती नळजोडणीद्वारे उपलब्ध करून देण्याची केंद्र शासनाची संकल्पना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

Kamthi News : नागपूर हादरल! रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी

SCROLL FOR NEXT