कोकण

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आदर्श शिक्षकांचा गौरव

CD

rat4p3.jpg-
O15437
मंडणगड ः यशतेज फाउंडेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक निलेश लोखंडे यांचा सत्कार करताना नगरसेवक आदेश मर्चंडे. सोबत डावीकडून अनिल रटाटे, अ‍ॅड. यश घोसाळकर, डॉ. भरतकुमार सोलापुरे, श्रीकांत जाधव, श्री. मिसाळ आदी.

युवकांसाठी चर्चासत्रे, प्रबोधनात्मक उपक्रम राबवा
आदेश मर्चंडे; आदर्श शिक्षक पुरस्काराने निलेश लोखंडे यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ : युवकांसाठी अधिक चर्चासत्रे व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याची गरज आहे. अभ्यासाची गोडी निर्माण करणे, गावाकडील ओढ टिकवून ठेवणे आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने युवकांचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन नगरसेवक आदेश मर्चंडे यांनी केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त यशतेज फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या गुणात्मक विकासासाठी सातत्याने कार्य करणारे मुख्याध्यापक निलेश लोखंडे (तिडे आदिवासी वाडी) यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी समाजसेवक अनिल रटाटे, यशतेज फाउंडेशनचे संस्थापक अ‍ॅड. यश घोसाळकर, डॉ. भरतकुमार सोलापुरे, श्रीकांत जाधव, श्री. मिसाळ आदी उपस्थित होते. याप्रसंगी श्रीकांत जाधव यांनी निलेश लोखंडे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा सादर केला.
यावेळी अ‍ॅड. यश घोसाळकर यांनी स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा मांडत प्रत्येक स्त्रीला तिचे हक्क मिळवून देण्यासाठी यशतेज फाउंडेशन कटिबद्ध असल्याचे सांगितले. स्त्रियांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबन, शासकीय योजनांची माहिती, कायदेशीर मार्गदर्शन तसेच स्थानिक पातळीवर लघुउद्योग उभारण्याचा फाउंडेशनचा संकल्प आहे, असे त्यांनी नमूद केले. डॉ. भरतकुमार सोलापुरे यांनी सहकाराच्या माध्यमातून स्थलांतर रोखून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, सत्काराला उत्तर देताना आदर्श शिक्षक निलेश लोखंडे यांनी आदिवासी भागातील शैक्षणिक आव्हाने आणि त्या आव्हानांना सामोरे जाताना आलेले अनुभव भावनिक शब्दांत मांडले. त्यांच्या विविध रचनात्मक उपक्रमांमुळे आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याचे कार्य कसे शक्य झाले, याची त्यांनी सविस्तर माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्ट संतापलं! आदेश न पाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, उशिरा अपीलही चालणार नाही

Donald Trump : एपस्टीन फाईल्सचा दुसरा पार्ट! डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक

Pune News : आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT