कोकण

ओसरगाव येथे शनिवारी पारंपरिक खेळांची कार्यशाळा

CD

ओसरगाव येथे शनिवारी
पारंपरिक खेळांची कार्यशाळा
राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगाव नं. १ शाळेचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ७ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओसरगाव नंबर १ येथे शनिवार १० जानेवारीला शालेय विद्यार्थ्यांसाठी मल्लखांब, लाठी–काठी व धनुर्विद्या या पारंपरिक खेळांची विशेष कार्यशाळा होणार आहे. सकाळी साडे आठ ते दुपारी अकरा या वेळेत ही कार्यशाळा होईल.
या कार्यशाळेस जिल्हा शिक्षण विभागाच्या जिल्हा समन्वयक स्मिता नलावडे, केंद्रप्रमुख बोर्डवे सूर्यकांत चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे तसेच शाळा व्यवस्थापन समिती ओसरगाव नंबर १ चे अध्यक्ष जीवबा अपराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगाव शाळा यांच्यावतीने हा उपक्रम होत असल्‍याची माहिती राजे प्रतिष्‍ठानचे विवेक परब आणि मुख्याध्यापक किशोर कदम यांनी दिली.
या कार्यशाळेसाठी बाळकृष्ण कवळे हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आत्मविश्वास आणि भारतीय परंपरेशी नाते जोडणारे हे पारंपरिक खेळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Live Update : मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सर्वधर्म रोजा इफ्तारचे आयोजन

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

Pune Flyover Video: उड्डाणपुलाच्या कामात तांत्रिक चूक? 'आप'ने शेअर केला विद्यापीठ चौकातील नवीन पुलाचा व्हिडीओ

Thane News : ...तर पालिका अधिकाऱ्यांच्या घरात आंघोळीला जावे लागेल - अभिजीत पवार

SCROLL FOR NEXT