कोकण

गुहागर -राष्ट्रवादीकडून गुहागरमध्ये मोर्चेबांधणी

CD

राष्ट्रवादीकडून गुहागरमध्ये मोर्चेबांधणी
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका; खासदारांनी दिली निधी
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ९ : तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांना घेऊन भेटीगाठी आणि खासदार सुनील तटकरे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा धडाका सुरू झाला आहे.
खासदार सुनील तटकरे यांच्या निधीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आणि अजय बिरवटकर यांच्याकडे पाठपुरावा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांनी गुहागर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे मंजूर करून आणली आहेत. या कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसकडून केले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुहागर तालुक्यातील विविध भागात भूमिपूजन कार्यक्रम पार पडले आहेत. त्यामध्ये तळवली, पेवे, कुडली, कारूळ, पाभरे, कोतळूक, आरेगाव अशा विविध भागातील विविध जिल्हा परिषद गटातील कामांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून लढणार की, पुन्हा एकदा नगरपंचायतीप्रमाणे स्वबळावर निवडणूक लढवणार की, अन्य कोणती आघाडी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे; पण विकासकामांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुक्यात जोरदार धडाका गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT