कोकण

जिमखाना मैदानाच्या समस्या सोडवू

CD

16760

जिमखाना मैदानाच्या समस्या सोडवू

नगराध्यक्षा भोसले ः क्रिकेट असोसिएशनला ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
​सावंतवाडी, ता. १० ः सिंधुदुर्ग जिल्हा लेदरबॉल क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी नगराध्यक्षांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सावंतवाडीतील ऐतिहासिक जिमखाना मैदानाच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ​यावेळी लखमराजे भोसले, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मंदार नार्वेकर, सचिव बाबा खान, खजिनदार शशी देऊळकर, सदस्य राजन नाईक, आनंद आळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष नार्वेकर यांनी जिमखाना मैदानावर खेळाडूंना भेडसावणाऱ्या विविध समस्या नगराध्यक्षांसमोर मांडल्या. महिला क्रिकेटपटूंना सराव करताना येणाऱ्या अडचणी, आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव आणि मैदानाची देखभाल या विषयांवर विस्तृत माहिती दिली. जिल्ह्यात क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी आणि महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ​नगराध्यक्षा भोसले यांनी जिमखाना मैदानाच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : मोठा दिलासा ! जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती उतरल्या, डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्ध संपविण्याचे संकेत

Jayant Patil: राज्य कर्जाच्या विळख्यात: आमदार जयंत पाटील यांचा सरकारवर घणाघात, घोषणांचा पाऊस आणि तरतुदींचा दुष्काळ!

Relief From Dangerous Potholes in Beed : सात वर्षांच्या संघर्षानंतर धानोरा रस्त्याला नवा श्वास; दोन टप्पे पूर्ण!

Satara Bribery Case: प्राध्‍यापक पदोन्नतीसाठी खटावमध्ये लाचखोरी; लाखोंच्‍या राेकडसह दाेन लोकसेवक ताब्यात, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

सोलापुरातील ‘या’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोलापूरचा लळा! कलेक्टर, सीपी, ॲडशनल एसपींचा कार्यकाळ पूर्ण; ५ अधिकाऱ्यांचाही कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार, वाचा...

SCROLL FOR NEXT