कोकण

''कोंडये''च्या विद्यार्थ्यांची जेसीबीतून मिरवणूक

CD

- rat१०p१२.jpg-
P२६O१६७३२
लांजा ः जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कोंडये शाळा नं. एकच्या खो-खो लहान गट मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
----
‘कोंडये’च्या विद्यार्थ्यांची जेसीबीतून मिरवणूक
खो-खो स्पर्धेत यश; ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १० ः जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत खो-खो (लहान गट) मुलांच्या संघाने अजिंक्यपद पटकावल्यानंतर लांजा तालुक्यातील कोंडये ग्रामस्थांनी गुरूवारी (ता. ९) खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, डीजेचा कडकडाट आणि जेसीबीत बसवून काढलेल्या मिरवणुकीमुळे हा विजयोत्सव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
डेरवण येथे नुकत्याच जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत कोंडये शाळा नं. १च्या मुलांच्या संघाने खो-खो खेळात उत्कृष्ट कामगिरी करत ‘जिल्हा चॅम्पियनशिप’वर आपले नाव कोरले. ग्रामीण भागातील या चिमुकल्यांनी जिल्ह्याच्या मैदानात मिळवलेले हे यश ऐतिहासिक मानले जात आहे. विजयी संघ गुरूवारी रात्री गावात दाखल झाला. या वेळी कोंडये गावच्या सीमेवर शेकडो ग्रामस्थ आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती. खेळाडूंचे स्वागत केल्यानंतर त्यांची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. आकर्षणाचे केंद्र ठरली ती म्हणजे खेळाडूंना जेसीबीमध्ये बसवून काढलेली मिरवणूक. डीजेच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण गाव न्हाऊन निघाले होते. संघात प्रेम चंदुरकर (कर्णधार), पार्थ झिमण, अर्णव माईल, अर्णव शिंदे, सम्यक कांबळे, कौशल नाटेकर, श्रवण गुरव आणि वेदांत रांबाडे यांचा समावेश आहे. या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक चेतन नाटेकर यांचे मार्गदर्शन लाभले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

Jalgaon News : जळगावात कायद्याचा धाक संपला? थेट पोलीस ठाण्यात शिरून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण!

Latest Marathi Live Update : इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धामुळे सात देशांतील सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द

SCROLL FOR NEXT