कोकण

भगवती हायस्कूलचा जिल्ह्यात आदर्श

CD

swt145.jpg
17689
मुणगेः ‘ज्ञानवेद’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करताना सुरेश बांदेकर. सोबत भगीरथ राणे, संजीव राऊत, विलास मुणगेकर, विजय बोरकर, एम. बी. कुंज, सुनील पारकर, देवदत्त पुजारे, नंदकुमार बागवे, संजय बांबुळकर, संदीप घाडी व अन्य मान्यवर.

भगवती हायस्कूलचा जिल्ह्यात आदर्श
सुरेश बांदेकरः मुणगेत वार्षिक स्नेहसंमेलन, गुणगौरव सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १४ ः येथील भगवती हायस्कूलमधील प्रत्येक विद्यार्थी आदर्श नागरिक व्हावा, यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम प्रशालेत राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शने केले जाते. विद्यार्थी आदर्श झाल्यास शाळा आदर्श होईल, असे प्रतिपादन श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुरेश बांदेकर यांनी केले. ते भगवती हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभात बोलत होते.
श्री भगवती एज्युकेशन सोसायटी संचलित श्री भगवती हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संस्थेचे उपाध्यक्ष बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी सेवाभारती कोकण प्रांत ट्रस्ट सिंधुदुर्गचे भगीरथ राणे, विशेष उपस्थिती शेठ म. ग. हायस्कूल देवगडचे माजी मुख्याध्यापक संजीव राऊत, विलास मुणगेकर, विजय बोरकर, मुणगे सरपंच अंजली सावंत, सुनील पारकर, मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, संस्थेचे व्यवस्थापक देवदत्त पुजारे, विजय पडवळ, हरी परुळेकर, मोर्वे पोलिसपाटील मुकेश धुरत, पोयरे माजी सरपंच संदीप घाडी, नंदकुमार बागवे, धर्माजी आडकर, संजय बांबुळकर, फिरती विज्ञान प्रयोगशाळाचे प्रकल्प मुख हेमंत आईर आदी उपस्थित होते.
प्रशालेमध्ये रांगोळी प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. बोरकर म्हणाले, ‘‘स्पर्धेतून आदर्श विद्यार्थी घडला पाहिजे. दुसरा विद्यार्थी वाईट मार्गाने जात असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. पालकांनी आपल्या पाल्यांकडे सतर्कतेने लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे.’’
यावेळी प्रमुख अतिथी संजीव राऊत, भगीरथ राणे, सुनील पारकर यांनी मनोगत व्यक्त केली. स्वागत मुख्याध्यापिका एम. बी. कुंज यांनी केले. विद्यार्थी निर्मित ‘ज्ञानवेद’ या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कामिनी परब, बाळकृष्ण बागवे, राजेंद्र प्रभू, शैलेश सावंत, गुरुप्रसाद मांजरेकर, सुनील सावंत, सुरेश नार्वेकर, सुनील बापट, एम. एम. हिर्लेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन गौरी तवटे व प्रसाद बागवे यांनी केले. आभार रश्मी कुमठेकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Election 2026 : राजकीय वातावरण तापलं! धुळ्यात शिंदे गटाच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक, खुर्च्यांची केली तोडफोड; भाजपने हल्ला केल्याचा आरोप

Mumbai Politics: विरोधकांची मराठी बाबतची भूमिका ही नकारात्मकतेने भरलेली; भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल, काय म्हणाले?

PF Withdrawal via BHIM App: लवकरच ‘BHIM’ अ‍ॅप द्वारेही ‘PF’ काढता येणार!, जाणून घ्या ‘ही’ सुविधा कधी उपलब्ध होणार?

Nagpur Crime : "मुलगी आईकडे देणार नाही"; नागपुरात रागाच्या भरात बापाने चिमुकल्या मुलीचा घेतला जीव!

Pune Holkar Bridge : होळकर पुलावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; धडक देऊन चालक पसार!

SCROLL FOR NEXT