कोकण

पेशवाईच्या सुवर्णकाळात राष्ट्रहित जपलं गेले

CD

-rat१४p१८.jpg-
P२६O१७७५४
चारुदत्त आफळे महाराज
----------
पेशवाईच्या सुवर्णकाळात राष्ट्रहित जपले गेले
चारुदत्तबुवा आफळे ः चिपळूण येथे दशकपूर्ती कीर्तनमाला
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे यांच्यानंतर स्वराज्यावरील आक्रमण रोखण्यात पेशवाईच्या काळात चांगले प्रयत्न झाले. यामध्ये स्वराज्याचा विस्तार करताना वैयक्तिक हित बाजूला ठेवण्यात आले. त्यामुळे स्वराज्याचा विस्तार अधिक जोमाने झाला. यामुळे पेशवाईचा काळ हा मराठेशाहीचा सुवर्णकाळ ठरला, असे राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारूदत्तबुवा आफळे यांनी कीर्तनमालेत सांगितले.
श्री स्वामी चैतन्य परिवार चिपळूण आयोजित दशकपूर्ती कीर्तनमालेतील ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’ आख्यानातील पहिल्या दिवशीचे कीर्तनपुष्प उलगडताना आफळेबुवा यांनी माहिती नसलेल्या इतिहासातील दाखले दिले. धर्मस्थापनेचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी त्यांच्या पूर्वजांनीही केला होता; पण त्याला यश राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेल्या शिवबांच्या हस्ते आले. जबाबदार माता-पिता व्हायचे असेल तर मुलांबरोबर वेळ हा दिलाच पाहिजे. स्वामी विवेकानंदांविषयी बोलताना रामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांच्याबद्दल बुवांनी माहिती दिली. समाधी सुखाचा आनंद अपेक्षित करणाऱ्या विवेकानंदांना देशहितासाठी कार्य करण्याचा सल्ला रामकृष्ण परमहंसांनी दिला होता. हिंदू धर्माचा ऱ्हास हा व्यापकहित व व्यक्तिगत हित हे न कळल्याने झाला हे पूर्वरंगाची समाप्ती करताना बुवांनी नमूद केले.
------
सहकलावंतांचा सन्मान
कार्यक्रमात सहकलावंत मिलिंद तायवाडे (तबला), मनोज भांडवलकर (पखवाज), चिंतामणी निमकर (ऑर्गन), वरद केळकर (सहगायक) आणि वज्रांग आफळे व संकेत भोळे (तालवाद्य) यांच्यासह संगीतकार कमलेश भडकमकर व प्रवचनकार धनंजय चितळे यांचा आयोजकांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Election 2026 : राजकीय वातावरण तापलं! धुळ्यात शिंदे गटाच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक, खुर्च्यांची केली तोडफोड; भाजपने हल्ला केल्याचा आरोप

Mumbai Politics: विरोधकांची मराठी बाबतची भूमिका ही नकारात्मकतेने भरलेली; भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल, काय म्हणाले?

PF Withdrawal via BHIM App: लवकरच ‘BHIM’ अ‍ॅप द्वारेही ‘PF’ काढता येणार!, जाणून घ्या ‘ही’ सुविधा कधी उपलब्ध होणार?

Nagpur Crime : "मुलगी आईकडे देणार नाही"; नागपुरात रागाच्या भरात बापाने चिमुकल्या मुलीचा घेतला जीव!

Pune Holkar Bridge : होळकर पुलावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; धडक देऊन चालक पसार!

SCROLL FOR NEXT