कोकण

मराठे महाविद्यालयात पत्रलेखन उपक्रम

CD

मराठे महाविद्यालयात
पत्रलेखन उपक्रम
राजापूर, ता. १६ ः आधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या‍ युगात संवादाची साधने अधिक वेगवान व सुलभ झाली असली तरी पत्रलेखनाचे महत्त्‍व आजही अबाधित आहे. पत्र हे केवळ संवादाचे साधन नसून, व्यक्तिमत्त्‍व घडवणारे, विचारांना दिशा देणारे, नातेसंबंध दृढ करणारे प्रभावी माध्यम आहे. म्हणूनच बदलत्या काळातही पत्रलेखन ही केवळ जुनी परंपरा न राहता आजच्या पिढीसाठी काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राजापूर पोस्ट ऑफिसमधील पोस्टल असिस्टंट संजय मटकर यांनी केले.
तालुक्यातील विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने पत्रलेखनाच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मटकर बोलत होते. या वेळी कला शाखेसह मराठी विभागप्रमुख डॉ. संजय मेस्त्री उपस्थित होते. राज्य व राष्ट्रीय स्तरावर भारतीय डाक विभागाच्या वतीने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून ’ढाई अक्षर’ पत्रलेखन ही स्पर्धा घेण्यात येत आहे. त्यामध्ये महाविद्यालयातील ९० विद्यार्थ्यांनी पत्रलेखनात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Love-Jihad: आता धर्म बदलणं कठीण होणार, लव्ह जिहाद करणाऱ्यांना शिक्षा मिळणार; महाराष्ट्र सरकारकडून विधेयक सादर

Narhari Zirwal : अन्न भेसळीविरोधात झिरवाळ आक्रमक! १९७ नवीन अधिकाऱ्यांची फौज मैदानात, कठोर कायद्याची तयारी

Devendra Fadanvis: 'गॅससाठी रांगा लावू नका', फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Pimpalgaon Ttoll Plaza : टोल की लूट? पूर्वसूचना न देता स्थानिक पास धारकांना बसतोय आर्थिक फटका; आंदोलनाचे संकेत

SCROLL FOR NEXT