कोकण

दोडामार्गात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

CD

दोडामार्गात पहिल्या दिवशी
एकही उमेदवारी अर्ज नाही
दोडामार्ग : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून ग्रामीण राजकारणात चुरशीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी १० उमेदवारी अर्ज विक्रीस गेले असले तरी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती महसूल नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी दिली. निवडणुकीचे बिगुल वाजलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी १६ जानेवारी ते २१ जानेवारीपर्यंत आहे. या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी दहा उमेदवारी अर्ज विक्रीस गेले. मात्र, एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, आरक्षणाच्या जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला जात प्रमाणपत्राचा १५-अ अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती राजमाने यांनी दिली. या निर्णयामुळे उमेदवारांची गैरसोय टळणार असून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करता येणार आहे. नामनिर्देशन दाखल करण्यासाठी केवळ ५ दिवस शिल्लक असून, आगामी दिवसांत मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज दाखल करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकूणच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत उमेदवारांची गर्दी  वाढण्याची शक्यता अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT