कुडाळ तहसील कार्यालयात
उमेदवारी अर्जासाठी गर्दी
कुडाळ, ता. १६ ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून येथील तहसीलदार कार्यालयात जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज घेण्यासाठी गर्दी केल्याने प्रशासकीय वातावरण निवडणूकमय झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विविध मतदारसंघांसाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) ताब्यात घेतले आहेत. जिल्हा परिषदेसाठी माणगाव, ओरोस, नेरूर-देऊळवाडा आणि पावशी यांसारख्या महत्त्वाच्या विभागांतून अर्ज घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने माणगावमधून सदाशिव आळवे (अपक्ष), ओरोस बु.-रामदास ठाकूर (अपक्ष), नेरूर-देऊळवाडा-बाळकृष्ण पावसकर (अपक्ष), पावशी-मंदार कोठावळे (अपक्ष), वेताळबांबर्डे-अनंतराज पाटकर (राष्ट्रवादी काँग्रेस - राष्ट्रवादी पवार गट). पंचायत समितीसाठी पहिल्या दिवशी झाराप, पिंगुळी, डीगस, कसाल आणि आंब्रड गणांमधून सर्वाधिक अर्ज घेतले गेले. शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांनी आज मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यात डिगसमधून विनायक अणावकर (शिवसेना - शिंदे गट व अपक्ष) आणि मंदार सखाराम कोठावळे, कसाल-चंद्रकांत राणे (शिवसेना - शिंदे गट), आंब्रड-अंकित नार्वेकर (शिवसेना - शिंदे गट), ओरोस बु.-अनंतराज पाटकर (राष्ट्रवादी काँग्रेस - राष्ट्रवादी पवार गट), झाराप-सदाशिव आळवे.
--------------
‘अपक्ष’ अर्जांवर भर
पहिल्या दिवशीच्या यादीवरून अनेक इच्छुकांनी पक्षाच्या अधिकृत अर्जासोबतच ‘अपक्ष’ म्हणूनही अर्ज घेण्यावर भर दिला आहे. विशेषतः शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) यांच्या उमेदवारांनी पहिल्याच दिवशी सक्रियता दाखवली आहे. उमेदवारी अर्ज वाटपाची ही प्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. अंतिम तारीख जवळ येईल, तशी ही गर्दी आणि राजकीय चुरस अधिक वाढण्याची शक्यता आहे. महायुतीबाबत आज घोषणा झाल्यानंतर आता बंडखोरी थांबवण्याचे मोठे आव्हान पक्षांसमोर उभे राहण्याचे चिन्ह दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.