कोकण

रत्नागिरी- भाट्ये, भाटकरवाडा किनारी जैवविविधतेचा अभ्यास

CD

rat17p21.jpg-
O18451
रत्नागिरी : सागर महोत्सवांतर्गत मिरकरवाडानजीक खडकाळ किनारी समुद्री जैवविविधतेची माहिती घेताना विद्यार्थी, अभ्यासक.
--------------
भाट्ये, भाटकरवाडा किनारी जैवविविधतेचा अभ्यास
सागर महोत्सवः विविध वयोगटातील २०० हून अधिक जिज्ञासूं, अभ्यासकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित चौथ्या सागर महोत्सवात समुद्री जैवविविधतेच्या अभ्यासासाठी विशेष निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विविध वयोगटातील २०० पेक्षा अधिक जिज्ञासू, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. भाट्ये समुद्रकिनारा व भाटकरवाडा, मिरकरवाडा परिसरातील खडकाळ किनारपट्टीचा अभ्यास या वेळी करण्यात आला.
या कार्यक्रमात समुद्री जीवसृष्टी तज्ज्ञ प्रदीप पाताडे आणि डॉ. अमृता भावे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत हेमंत कारखानीस, शांभवी चव्हाण आणि रानिया अन्सारी हेही उपस्थित होते. निरीक्षणादरम्यान सहभागी नागरिकांना समुद्रातील विविध जीवसृष्टी आणि वनस्पतींबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. यामध्ये इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन, ग्रीन बटण पॉलिप, पर्पल झूअँथिड्स, स्नोफ्लेक कोरल्स, फायर कोरल, अरेबियन काउरी, अंजुना व बर्गंडी अ‍ॅनेमोन, क्रस्टोज कोरलाइन अल्गी, वाय आकाराच्या फांद्यांची अल्गी, पीकॉक टेल व सारगॅसम अल्गी, बार्नेकल्स, वर्म स्नेल्स, लिम्पेट्स, समुद्री स्नेल्स आणि मॉटल्ड लाईटफूट खेकडा अशा अनेक प्रजातींचे पाहता आल्या.
भाट्ये समुद्रकिनारी वाळूच्या किनाऱ्यावर फेरफटका उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी विद्यार्थ्यांना वाळूच्या किनाऱ्यावर आढळणाऱ्या विविध समुद्री जीवसृष्टीची ओळख करून देण्यात आली. यामध्ये दागिन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बटण शिंपल्या, वाळूच्या किनाऱ्यावर सहसा न आढळणारा डेकोरेटर खेकडा, शिंपले (मसल्स), पेबल क्रॅब, बीन क्लॅम्स, मून क्रॅब, समुद्री शेवाळ, सॅंड बबलर खेकडा, घोस्ट क्रॅबची बिळे, ऑलिव्ह साप तसेच हर्मिट खेकडा अशा अनेक प्रजाती पाहायला मिळाल्या.

चौकट १
पर्यावरणाची जबाबदारी सर्वांची
या उपक्रमातून समुद्री परिसंस्थेचे महत्त्व, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणाबाबतची जबाबदारी या विषयी जनजागृती करण्यात आली. अशा प्रकारचे शैक्षणिक व अभ्यासपूर्ण उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा सहभागी नागरिकांनी व्यक्त केली. समुद्री जीव पाहतानाच किनाऱ्यावर पडलेल्या प्लास्टिकचे प्रकारही लक्षात घ्या, असा महत्त्वाचा संदेश समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक प्रदुषणाबाबत दिला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: विदर्भाने इतिहास घडवला! थरारक फायनल जिंकून पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंडने पहिल्यांदा भेदला भारताचा अभेद्य किल्ला! इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल, विराट कोहलीचं शतक व्यर्थ

तुम्ही सत्तेत तर याल पण...; भाजपवर जहरी टीका करत कपिल सिब्बल यांचा अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना मोठा संदेश, काय म्हणाले?

IND vs NZ, ODI: न्यूझीलंडविरुद्ध मालिका तर गमावली, आता विराट कोहली-रोहित शर्मा भारतीय संघाकडून पुन्हा कधी खेळणार?

Black Color Psychology : ज्यांना काळा रंग आवडत नाही त्या लोकांची पर्सनॅलिटी कशी असते? स्वभाव तर असा असतो की आयुष्यभर...

SCROLL FOR NEXT