कोकण

रोणापालमध्ये बिबट्याच्या वावराने भीतीचे वातावरण

CD

18510

रोणापालमध्ये बिबट्याची
दहशत, बंदोबस्ताची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ ः रोणापाल गावात गेले आठ दिवस भर दिवसा बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत आहे. या रस्त्यावरून शाळेतील मुले, ग्रामस्थ यांची नेहमी येजा सुरू असते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली, परंतु वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी येऊन केवळ हजेरी लावण्याचे काम केले, बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा ठोस असा कोणताही पर्याय त्यांनी राबवला नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या दिसला तरच वनखात्याकडून त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल, असे ग्रामस्थांना सांगण्यात आले. रोणापाल गावातील भर वस्तीत बिबट्या मुक्त संचार करत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पावले उचलावीत, अन्यथा २६ जानेवारीला सर्व ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच प्रकाश गावडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण, तंटामुक्ती अध्यक्ष सुदिन गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश गावडे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

Fake Teacher Shalarth ID Scam in Nashik : 3 बड्या अधिकाऱ्यांसह 841 शिक्षकांवर गुन्हे दाखल! पगाराच्या नावाखाली सरकारला घातला 150 कोटींचा गंडा; शिक्षण क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT