पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

Salman Ali Agha Runout Controversy बांगलादेशविरुद्धचा दुसरा सामना पाकिस्तानचा सलमान अली आगाच्या वादग्रस्त धावबादमुळे चर्चेत आला आहे. सलमानला ज्या पद्धतीने धावबाद केलं ते योग्य नसल्याचं भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटर मोहम्मद कैफने म्हटलं.
Runout Incident of Salman Ali Agha Draws Criticism

Runout Incident of Salman Ali Agha Draws Criticism

Esakal

Updated on

बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना जिंकून पाकिस्तानने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दुसरा सामना पाकिस्तानने १२८ धावांनी जिंकला. पहिल्या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानला ८ गडी राखून लोळवलं होतं. दरम्यान, दुसरा सामना पाकिस्तानचा सलमान अली आगाच्या वादग्रस्त धावबादमुळे चर्चेत आला आहे. अनेकांनी पाकिस्तानच्या सलमान अली आगाची बाजू घेतलीय तर काहींनी बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजने जे केलं ते खिलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचं मह्टलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com