तुळस-लिंगदाडावाडीत
जिल्हास्तर भजन स्पर्धा
वेंगुर्ले ः गणपती कृपा मित्रमंडळ, तुळस-लिंगदाडावाडी यांच्यावतीने माघी श्री गणेश जयंती निमित्त भाजप युवा नेते विशाल परब आणि सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब पुरस्कृत जिल्हास्तरीय निमंत्रित भजनी बुवांच्या भजन स्पर्धेचे गुरुवारी (ता. २२) सायंकाळी ५ वाजता तुळस लिंगदाडावाडी येथील पटांगणावर आयोजन केले आहे. स्पर्धेत सायंकाळी सातला जैन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ, वालावल. (भूषण घाडी), रात्री ८ वाजता सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ, अणसूर, वेंगुर्ले (हर्षल मेस्त्री), ९ वाजता चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ सुरंगपाणी, तळेकरवाडी, वेंगुर्ले (अनिकेत भगत), रात्री १० वाजता गुरुकुल संगीत भजन मंडळ कुडाळ (अद्वैत पालव), रात्री ११ वाजता राम कृष्ण हरी भजन सेवा संघ पाट पंचक्रोशी (आशिष सडेकर), रात्री १२ वाजता महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी (प्रसाद आमडोस्कर) यांची भजने होणार आहेत. प्रथम क्रमांकास ७,७७७, द्वितीय ६,६६६, तृतीय ५,५५५ तसेच उत्तेजनार्थ प्रथम २,२२२, उत्तेजनार्थ द्वितीय १,५५५, उत्तेजनार्थ तृतीय १,१११ रुपये व वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
-------
चराठ्यात गुरुवारी
माघी गणेश जयंती
सावंतवाडी ः चराठा जुना गावठाण तिलारी कॉलनी रोडजवळील रायकर देवस्थान येथे गुरुवारी (ता. २२) गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी (ता. २३) ब्राह्मण भोजन होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
......................
निवतीत गुरुवारी
धार्मिक कार्यक्रम
म्हापण ः निवती गणेशतड येथील गणेश मंदिरात गुरुवारी (ता. २२) माघी गणेश जयंती साजरी करण्यात येणार आहे. सकाळी श्रींचे अभ्यंगस्नान, अभिषेक, पूजन, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद तसेच सायंकाळी ग्रामस्थांची भजने आदी कार्यक्रम होणार आहेत. लाभ घेण्याचे आवाहन गणेश मंदिर उत्सव कमिटीने केले आहे.
....................
मळगाव येथे गुरुवारी
गणेश जयंती उत्सव
आरोंदा ः मळगाव-तेलीवाडा येथील गणेश मंदिरात गुरुवारी (ता. २२) माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता अभिषेक, पूजा, १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वाजता आरती व तीर्थप्रसाद, १ वाजता महाप्रसाद होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन सुधीर भागवत गुरुजी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.