कोकण

खेड - न्यू मांडवे प्रकल्प मार्गी लावा, अन्यथा आत्मदहन

CD

न्यू मांडवे प्रकल्प मार्गी लावा अन्यथा आत्मदहन
मुंबई येथे भूमिपुत्रांची सभा; आमदार व खासदारांशी चर्चा करणार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २० : तालुक्यातील न्यू मांडवे धरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तसेच प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भूमिपुत्र नितीन जाधव यांनी जाहीर केलेल्या आत्मदहनाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवत कोणत्याही परिस्थितीत त्यांना एकटे सोडले जाणार नाही, अशी ठाम भूमिका मुंबई येथे झालेल्या भूमिपुत्रांच्या सभेत मांडण्यात आली. या प्रश्नावर आमदार व खासदारांशी चर्चा करून आवश्यक ते सहकार्य मिळवण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.
नितीन जाधव यांच्या आत्मदहनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी मुंबईत न्यू मांडवे धरण प्रकल्पासंदर्भात भूमिपुत्रांची बैठक पार पडली. या सभेला मुंबईस्थित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी स्थानिक ग्रामस्थ रवींद्र निकम, सुधाकर कदम आणि अशोक शेलार यांनी सभेचे नेतृत्व केले. बैठकीत नितीन जाधव यांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. न्यू मांडवे धरण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत सभेत व्यक्त करण्यात आले. त्यांची पुन्हा भेट घेऊन वित्तमंत्र्यांकडे अडकलेली प्रकल्पाची फाईल कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी पुढे नेण्याबाबत आग्रह धरण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन या दुर्लक्षित प्रकल्पाची माहिती देत शासनस्तरावर तातडीची कार्यवाही व्हावी यासाठी विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चौकट
लोकचळवळीचा निर्धार
नितीन जाधव यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी समजावण्यासह भविष्यात न्यू मांडवे धरण प्रकल्पासाठी मोठी लोकचळवळ उभारण्याचा निर्धार सभेत करण्यात आला. या वेळी सीताराम कदम (तळे-चिंचवाडी), संभाजी शेलार, सुभाष कदम (दहिवली) आणि एकनाथ निकम (किंजळेतर्फे नातू) यांनीही आपली मते मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्ट संतापलं! आदेश न पाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, उशिरा अपीलही चालणार नाही

Donald Trump : एपस्टीन फाईल्सचा दुसरा पार्ट! डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक

Pune News : आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT