-rat२२p९.jpg-
२६O१९४२३
रत्नागिरी : शासकीय चित्रकला स्पर्धेत यश मिळवणारे पटवर्धन हायस्कूलचे विद्यार्थी. पुढे बसलेले डावीकडून रूपेश पंगेरकर, मुग्धा पाध्ये, कल्पना शिरोळकर, जानकी घाटविलकर, नंदकुमार साळवी, श्रीकृष्ण दळी, प्रवीण आंबेकर, अमर लवंदे आदी.
----
अनिहा सुर्वे राज्य गुणवत्ता यादीत
रेखाकला परीक्षा; पटवर्धन हायस्कूलचा निकाल १०० टक्के
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांमध्ये पटवर्धन हायस्कूलने यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. इंटरमिजिएट परीक्षेत अनिहा सुर्वे ही राज्य गुणवत्ता यादीत ६७वी आली.
इंटरमिजिएट परीक्षेला ४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात आर्या गोडबोले, आयुष्य चौगुले, अनिहा सुर्वे, चैतन्या देवरूखकर, इशा वायंगणकर, गार्गी लोटणकर, गीता गायकवाड, हर्षा तोडणकर, मधुरा पाटील, मृण्मय आरेकर, मृण्मयी पांचाळ, नंदिता हळदणकर, नित्या फणसे, प्रतिज्ञा सावंत, सानिका अल्लोळकर, सारा वायंगणकर, श्रद्धा कोठणकर, श्रीया राऊत, श्रीयांश रसाळ, स्वरा वैद्य, स्वरा बनप, स्वराज साळुंखे, तनया भाटकर, तन्मय देसाई, तन्वी सागवेकर, वैदेही सावंतदेसाई, वरद खानविलकर या विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणी मिळाली.
एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षेला प्रविष्ट झालेले ६८ पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ओंकार केळकर, अंश भावे, अनुष्का कुलकर्णी, अन्वय कुळेकर, अर्णव शहाणे, आर्या रहाटे, अवनी नागवेकर, दत्तात्रय नार्वेकर, दुर्वा लाड, कार्तिकी भुरवणे, खुशी कांबळे, रिद्धी नागवेकर, सान्वी वाडेकर, श्लोक जोशी, श्रावणी शेडेकर, श्रील मांजरेकर, श्रीशा कोतवडेकर, स्वराज भाटकर, तितिक्षा जाधव, वैष्णवी शिनगारे, वेदा लिंगायत, अर्पिता मिराशी या विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणी मिळाली. इंटरमिजिएटसाठी उपमुख्याध्यापक, कलाशिक्षक रूपेश पंगेरकर व एलिमेंटरीसाठी कलाशिक्षिका मुग्धा पाध्ये यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे, पर्यवेक्षिका कल्पना शिरोळकर व भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह धनेश रायकर, खजिनदार नित्यानंद भुते आदींनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.