19791
मराठी संवर्धनासाठी
वाचन संस्कृती रुजवा
व्ही. एस. देशमुख ः ‘विधी सेवा’तर्फे व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ ः मराठी भाषा संवर्धन ही काळाची गरज आहे. वेगवेगळ्या मराठी कवी, लेखकांची पुस्तके वाचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या १८ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार दरवर्षी १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा न्यायालयात साजरा केला जातो. त्याअनुषंगाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी भाषा व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी न्यायाधीश श्रीमती देशमुख बोलत होत्या.
यावेळी दिवाणी न्यायाधीश व. स्तर व अतिरिक्त. मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. चेंडके, सहदिवाणी न्यायाधीश व. स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. जी. देशिंगकर, सहदिवाणी न्यायाधीश व.स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. व्ही. नडगदल्ली, सहदिवाणी न्यायाधीश व.स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जे. पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संपूर्णा गुंडेवाडी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कनिष्ठ अभियंता मयुरी दिवाण उपस्थित होते. मयुरी दिवाण यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त मार्गदर्शन केले. शासकीय कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केल्यास शासकीय काम अधिक सुलभ व सोपे होते, असे सांगितले. सहाय्यक लोक अभिरक्षक ॲड. श्वेता तेंडुलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.