-rat२४p१४.jpg-
P२६O१९८३१
साखरपा : सूर्यनमस्कार घालताना विद्यार्थी.
---------
‘कबनूरकर’मध्ये सूर्यनमस्कार संकल्पपूर्ती
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २४ : कोंडगाव येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सूर्यनमस्कार संकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. १३ हजार सूर्यनमस्कार घालण्यात आले. पालकांनी या उपक्रमात मोठा सहभाग दाखवला. अतुल शिर्के, भिकाजी पवार, विवेक गुरूपादगोळ, सूरज कांबळे, श्रेया लिंगायत, जान्हवी पांगळे यांनी दरवर्षीप्रमाणे सातत्य दाखवत सूर्यनमस्कार घातले. शिक्षकांमध्ये केंद्रशाळा नं. १ चे मुख्याध्यापक सागवेकर, पद्माकन्या शाळेच्या मुख्याध्यापिका चारुता खानविलकर, केंद्रीय प्रमुख दिव्या भाटकर यांनी सूर्यनमस्कार घातले. याचबरोबर शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था अध्यक्ष श्रीधर कबनूरकर यांनी सूर्यनमस्कार घातले. हंसीता पांगळे, दीक्षिता कारेकर, मिहिर गद्रे, अवधूत चव्हाण, राज चव्हाण, तनिश जोयशी या माजी विद्यार्थ्यांनीही सहभाग घेत सूर्यनमस्कार घातले. योगशिक्षक धनंजय प्रभूघाटे या वेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.