कोकण

केंद्रीय अर्थसंकल्पात विकासाची नवी दिशा

CD

21357

केंद्रीय अर्थसंकल्पात
विकासाची नवी दिशा

विजय केनवडेकर ः संशोधनावरही भर

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ : केंद्राने सादर केलेला अर्थसंकल्प हा तरुणांना प्रोत्साहन देणारा आणि देशाच्या शाश्वत विकासाला नवी दिशा देणारा आहे. मागील चार अर्थसंकल्पांतील धोरणांची ही एक सुसंगत आणि प्रगत पायरी असल्याचे मत सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्रालयाचे राष्ट्रीय सदस्य विजय केनवडेकर यांनी व्यक्त केले आहे.
केनवडेकर म्हणाले, की ‘‘२२ ते ३५ वयोगटातील तरुण, जे शिक्षणासोबतच नवनवीन संकल्पनांवर काम करत आहेत, त्यांना या अर्थसंकल्पात विशेष बळ दिले आहे. यामुळे नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सना चालना मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. उद्योगांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्यासाठी प्रशिक्षण संस्थांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भारतीय उत्पादनांचा दर्जा जागतिक स्तरावर नेण्यासाठी औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनावर भर दिला असून अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी मोठी तरतूद केली आहे. गारमेंट (वस्त्रोद्योग) आणि फुटवेअर क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठी विशेष करसवलती जाहीर केल्या आहेत. याचा मुख्य उद्देश भारताची निर्यात वाढवणे हा आहे. हा अर्थसंकल्प कौशल्याधारित कामगारांसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणारा असून भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल. हा अर्थसंकल्प केवळ सवलती देणारा नसून उद्योजकतेला खऱ्या अर्थाने बळ देणारा आणि भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणारा ठरेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात मोठा बदल! एक तोळा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या ताजा भाव

Axar Patel: अहमदाबादमध्ये सामना? मैं हूँ ना ! अंतिम सामन्याबाबत अक्षर पटेलकडून निर्धास्त राहण्याचा दिलासा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Success Story: गिरवीचा विशाल वाघ ठरला राज्यात अव्‍वल; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, सर्व स्तरांतून होतेय कौतुक

SCROLL FOR NEXT