कोकण

नॅशनल हायस्कूलमध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धा

CD

मंथन परीक्षेत
२९१ विद्यार्थी सहभागी
पाली ः स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून युपीएससी, एमपीएससी तसेच स्कॉलरशिप परीक्षेचा पाया मजबूत करण्यासाठी मंथन वेल्फेअर फाउंडेशन संचलित मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा पालीतील सामंत इंग्लिश स्कूल येथे झाली. या परीक्षेसाठी पाली परिसरातील जिल्हा परिषदेच्या २३ प्राथमिक शाळांतील २९१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात पहिलीचे ३२ विद्यार्थी, दुसरीचे ६० विद्यार्थी, तिसरीचे ८१ विद्यार्थी, चौथीचे ५१ विद्यार्थी, पाचवीचे १९ विद्यार्थी, सहावीचे २८ विद्यार्थी, सातवीचे २० विद्यार्थी, असे एकूण २९१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून संजय शेलार यांनी, तर मारुती घोरपडे, स्नेहा ठाकरे, माधुरी शिंदे-पाटील, सामंत स्कूलच्या रिया घगवे, नेहा भोसले यांनी पर्यवेक्षण केले.
---------
नॅशनल हायस्कूलमध्ये
प्रश्नमंजूषा स्पर्धा
दापोली ः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासास चालना मिळावी तसेच स्पर्धा परीक्षांविषयी त्यांच्यात गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने दापोली येथील नॅशनल हायस्कूलमध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धा उत्साहात झाली. हिवाळी सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रश्नपेढीचे वाटप करण्यात आले होते. त्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करून प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटांत घेण्यात आली. प्राथमिक गटात एमन फडणीस याने प्रथम, फलक कलदाणेने द्वितीय, तर तहुरा रखांगेने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात ज्वेरिया मुकादम, तहरीम सौतीरकर, आयेशा नदाफ यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले.
-----------------

नॅशनल हायस्कूलमध्ये
वार्षिक पारितोषिक वितरण
दापोली ः नॅशनल हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. कार्यक्रमाला शिक्षक-पालक संघाचे सदस्य सर्फराज ऐनरकर, मुख्याध्यापक अय्युब मुल्ला आदी उपस्थित होते. शैक्षणिक वर्षात शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. प्रतिवर्षी दिला जाणारा स्व. बदीउज्जमा खावर स्मृती सन्मान नववीतील अलिझा नाईक हिला प्रदान करण्यात आला. तसेच आदर्श विद्यार्थी म्हणून अदनान ममतुले व आदर्श विद्यार्थिनी म्हणून जिया जमादारचा सन्मान करण्यात आला.
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

अग्रलेख : उजेडातील रोषणाई!

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT