swt38.jpg
21767
मळगाव ः पारंपरिक पायी वारीमध्ये सहभागी झालेले भाविक भक्त.
मळगाव-माणगाव पारंपरिक वारी
‘दिगंबरा’च्या जयघोषात उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः गुरुप्रतिपदेनिमित्त ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामस्मरणात सोमवारी (ता. २) मळगाव येथील दत्तमंदिर ते माणगाव दत्तमंदिर अशी पारंपरिक पायी वारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. सलग २१ व्या वर्षी परंपरेचे जतन करत २१ किलोमीटरचा पायी प्रवास भक्तिभावात पूर्ण करण्यात आला. पहाटे ५ वाजता मळगाव-आजगावकरवाडी येथील श्री दत्त मंदिरातून या पायी वारीस प्रारंभ झाला.
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ नामजप करत, मृदंग व टाळांच्या गजरात ही वारी मळगाव, नेमळे, आकेरी, हुमरस मार्गे माणगाव येथील श्री दत्त मंदिराकडे मार्गस्थ झाली. सकाळी सुमारे १०.३० वाजता माणगाव येथील दत्त मंदिरात पोहोचली. तेथे दर्शन व गुरुचरणी प्रार्थना करून वारीची सांगता करण्यात आली. सुमारे २१ किलोमीटरचा हा प्रवास भक्तांनी दत्तनामाच्या जयघोषात व उत्साहपूर्ण वातावरणात पूर्ण केला. या पायी वारीत मिलिंद पंतवालावलकर, महेश पंतवालावलकर, उपेंद्र पंतवालावलकर, मनोहर सामंत, अमोल सामंत, भगवान नाईक, लवू कोचरेकर, एकनाथ सावंत, विल्सन फर्नांडिस, स्वप्नील परब, हनुमंत गावडे, गजानन सामंत, मेघःश्याम राणे यांच्यासह मळगाव, तेंडोली व माणगाव परिसरातील असंख्य ग्रामस्थ व दत्तभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.