कोकण

-राजापुरात निवडणुकीचा निकाल महिलांच्या हाती

CD

राजापूरचा निकाल महिलांच्या हाती
जिल्हा परिषद निवडणूक ; महिला मतदार अधिक, प्रचार जोरात
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीमध्ये १ लाख २० हजार ७०४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ५६ हजार ९४८ पुरुष, तर ६३ हजार ७५६ महिला मतदारांचा समावेश आहे. महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वर्चस्व महिलांच्या हाती राहणार आहे.
उमेदवारांसह राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचारयंत्रणा राबवली जात आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यामध्ये १ लाख २० हजार ७०४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये वडदहसोळ गटातील १९ हजार ४०९, तळवडे गटातील १९ हजार ७३९, जुवाठी गटातील १९ हजार ५६, धोपेश्वर गटातील १९ हजार ७८८, साखरीनाटे गटातील २१ हजार ३७३, कातळी गटातील २१ हजार ३३९ मतदारांचा समावेश आहे. पंचायत समिती गणनिहाय मतदार संख्येचा विचार करता वडदहसोळ गणामध्ये ९ हजार ९९४, रायपाटण ९ हजार ४१५, तळवडे १० हजार ९६, ताम्हाणे ९ हजार ६४३, केळवली ९ हजार ३३०, जुवाठी ९ हजार ७२६, धोपेश्वर ११ हजार ५०८, पेंडखळे ८ हजार २८०, नाटे १० हजार ५५०, साखरीनाटे १० हजार ८२३, अणसुरे १० हजार १६८, कातळी ११ हजार १७१ एवढे मतदार समाविष्ट आहेत.
पुरुष मतदारांच्या तुलनेमध्ये महिला मतदारांची सख्या ६ हजार ८०८ ने जास्त आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालामध्ये महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
----------
चौकट ः
दृष्टिक्षेपात राजापूर
एकूण मतदार ः १ लाख २० हजार ७०४
पुरुष मतदार ः ५६ हजार ९४८
महिला मतदार ः ६३ हजार ७५६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT