kan41.jpg
22103
कणकवली : येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे तसेच निवडणूक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
कणकवली तालुक्यात ८०० कर्मचारी तैनात; ईव्हीएम मशीनचे सिलिंगचे काम पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यासाठी तालुक्यातील प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्यात ८०० कर्मचारी व अधिकारी तैनात असणार आहेत. याशिवाय राखीव कर्मचारीही असणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जगदिश कातकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.
ईव्हीएम मशीनचे सीलिंग पूर्ण झाले असून कर्मचाऱ्यांची दोन प्रशिक्षणही पूर्ण झाली आहेत. राखीव अधिकारी व कर्मचाऱ्यांसहीत सुमारे आठशे कर्मचारी तैनात असणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी १४ एसटी बसेस, १४ जीप गाड्यांच्या माध्यमातून निवडणूक साहित्य ६ फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रांवर पोहोचविण्यात येणार आहे. कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती यांसाठी एकूण ११८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे यासाठी एकूण ११८ ईव्हीएम मशीन व २८ राखीव मशीन तयार केलेल्या आहेत.
प्रत्येक केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी व शिपाई असे मिळून ८०० कर्मचारी व अधिकारी तैनात असणार आहेत याशिवाय राखीव कर्मचारीही असणार आहेत. तसेच एकूण १४ झोनल अधिकारी, चार राखीव झोनल अधिकारी असणार आहेत. तालुक्यात बिनविरोध झालेल्या निवडणुकीमुळे जानवली जिल्हा परिषद मतदार संघातील १७ केंद्रांवर मतदान होणार नाही. त्यामुळे या केंद्रांवरील ११७ कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून निवडणूक साहित्य मतदान केंद्रांवर रवाना करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी बसेस व जीप गाड्यांच्या माध्यमातून मतदान साहित्य व कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना करण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.