- rat५p२.jpg -
P२६O२२२३७
संगमेश्वर ः मालपवाडी येथील नीतेश मालप यांना पाकीट देताना बाबू बावधाणे.
-----
सापडलेले पाकीट मालकाच्या स्वाधीन
बावधाणे यांचा प्रामाणिकपणा; कळंबस्ते येथील प्रकार
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ५ ः रस्त्यात सापडलेले पाकीट आणि त्यातील महत्त्वाची कागदपत्रे मूळ मालकाला परत करून संगमेश्वर तेलेवाडी येथील सुरेश बावधाणे यांनी निःस्वार्थी वृत्तीचे दर्शन घडवले आहे.
अंत्रवली मालपवाडी येथील रहिवासी नीतेश मालप हे कळंबस्ते येथे प्रवास करत असताना त्यांचे पाकीट रत्यात पडले. या पाकिटात केवळ रोख रक्कमच नव्हती तर त्यांचे वाहनचालक परवाना, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड आणि गाडीची मूळ कागदपत्रे होती. ही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असल्याने आणि ती पुन्हा मिळवणे जिकिरीचे असल्याने मालप प्रचंड चिंतेत होते. हे पाकीट तेलेवाडीचे रहिवासी सुरेश बावधाणे यांना सापडले. पाकिटातील कागदपत्रे पाहिल्यानंतर त्यांनी वेळ न घालवता तातडीने मालप यांचा शोध घेतला. त्यांनी ते पाकीट त्यांच्या स्वाधीन केले. हरवलेली वस्तू सुरक्षितपणे मालकापर्यंत पोहोचवणे हे माझे कर्तव्यच होते, अशी भावना बावधाणे यांनी या वेळी व्यक्त केली. आजच्या काळात हरवलेली वस्तू किंवा पैसे परत मिळणे कठीण झाले असताना, बावधाणे यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे फणसवणे आणि संगमेश्वर परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.