कोकण

अमृत ड्रोनतर्फे तरुणांना प्रशिक्षण

CD

अमृत ड्रोनतर्फे
तरुणांना प्रशिक्षण
रत्नागिरी : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वबळावर उभे करण्यासाठी विविध उद्योजकता कार्यक्रम अमृत या संस्थेतर्फे राबवले जातात. कीटकनाशक फवारणी आणि पीक सर्वेक्षण करण्यापासून ते भूमापन, सरकारी प्रकल्पांचे निरीक्षण, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा प्रभावी वापर होत आहे. ही गरज ओळखून अमृतने प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण मोहीम सुरू केली आहे. राज्यातील आठ केंद्रांवर हे प्रशिक्षण दिले जाते. या योजनेचा लाभ प्रामुख्याने खुल्या प्रवर्गातील अशा जातींना दिला जातो, ज्यांना इतर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही. ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा लक्ष्यित गटातील नागरिकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ''अमृत''चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक तपशिलासाठी संस्थेचे संकेतस्थळ https://mahaamrut.org.in/ आणि सोशल मीडिया हँडल्सचा वापर करावा.

रत्नागिरीत ११ ला
रोजगार मेळावा
रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्राद्वारे बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी देण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन ११ फेब्रुवारीला सकाळी १० वा. राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), नाचणे रोड, पो. एमआयडीसी, रत्नागिरी येथे केले आहे. जिल्ह्यातील उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्याची नोंदणी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. ११ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये या दिवशी मुलाखतीकरिता त्यांचे बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतीसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या रोजगार मेळावात सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळावा किंवा प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.


पीयूसीसीसाठी आधार
मोबाईल क्रमांक अनिवार्य
रत्नागिरी ः केंद्र शासनाच्या सूचनांनुसार, वाहनमालकांचे अद्ययावत संपर्क तपशील वाहनप्रणालीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे पीयूसीसी, विमा, कर, दंड (ई-चलन) इत्यादी वाहनासंबंधी महत्त्‍वाच्या सूचना वाहनधारकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर पीयूसीसी सेवेसाठी वाहनमालकाचा आधार प्रमाणीकरण केलेला मोबाईल क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार पीयूसीसी सेवा देताना वाहनमालकाचा आधार-प्रमाणीकरण केलेला मोबाईल क्रमांक उपलब्ध नसल्यास पीयूसीसी सेवा देण्यात येणार नाही, याची नोंद सर्व वाहनमालकांनी व पीयूसीसी केंद्रांनी घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे. ही प्रक्रिया वाहनप्रणालीवर दोनस्तरीय प्रमाणीकरण वापरून राबवावीत. ही संपूर्ण अंमलबजावणी एका महिन्याच्या कालावधीत पूर्णपणे कार्यान्वित करण्यात यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: शिर्डीच्या प्राईम भूखंडावर घाईघाईने गव्हाची कापणी! कॅप्टन खरातच्या अफाट संपत्तीचे धक्कादायक रहस्य उघड... कुठे किती संपत्ती?

Nashik Temple Theft : देवही सुरक्षित नाहीत! सातपूरमधील ३ मंदिरांच्या दानपेट्या फोडणारा चोरटा गजाआड

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT