कोकण

-जि. प. शाळा दुरुस्तीसाठी हवेत पावणेनऊ कोटी

CD

डिजिटल शिक्षण, मोडक्या इमारती
जिल्हा परिषदेच्या २२८ शाळांची अवस्था; दुरुस्तीसाठी पावणेनऊ कोटींची गरज, नियोजनाकडे प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळांना ‘डिजिटल झळाळी’ प्राप्त झाली आहे. मात्र इमारतींची अवस्था सध्या बिकट झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे २२८ प्राथमिक शाळांच्या इमारती नादुरुस्त आणि धोकादायक असून, त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने जिल्हा वार्षिक योजनेतून आठ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रामुख्याने गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांमुळे या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारला असून, अनेक शाळांनी ‘डिजिटल’ झळाळी प्राप्त केली आहे; मात्र, एकीकडे तंत्रज्ञानाची कास धरली जात असताना दुसरीकडे मात्र मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासनाकडे शाळा दुरुस्तीचा सविस्तर प्रस्ताव पाठवला आहे. सध्याच्या आचारसंहितेचा काळ संपल्यानंतर या प्रस्तावावर वेगाने हालचाली होणे अपेक्षित आहे. शाळा व्यवस्थापन समित्या आणि पालकांकडून वारंवार होणाऱ्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने हा निधी मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू केला आहे. दरम्यान, काही शाळांनी लोकसहभागातून डिजिटल साधने मिळवली असली तरी मूळ इमारतींच्या गळती आणि भिंतींना गेलेल्या भेगांमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती पुढे येत आहे.
----
चौकट
शाळांच्या कामांची सद्यःस्थिती
* (२०२५-२६) : ४६ नवीन खोल्यांच्या बांधकामासाठी ५ कोटी ४७ लाख रुपये मंजूर.
* (२०२५-२६) : ६९ शाळांच्या डागडुजीसाठी ४ कोटी ५२ लाख रुपये मंजूर.
* जिल्ह्याभरात अजूनही २२८ शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT