कोकण

कोंड्येतील वृद्धाश्रमाची जीएफ प्लसकडून पाहणी

CD

-rat६p९.jpg-
P२६O२२४७६
कोंड्येतील वृद्धाश्रमाची पाहणी करताना जीएफ प्लस कंपनी आणि वॉटर फाउंडेशनचे पदाधिकारी.
-------
कोंड्येतील वृद्धाश्रमाला जीएफ प्लसची भेट
संस्थेच्या कार्याचे कौतुक ;गरजू वृद्धांसाठी हक्काचे घर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः रत्नागिरी जिल्ह्यातील कोंड्ये येथे भाकर सेवा संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या आजी-आजोबांचा गाव या निराधार वृद्धाश्रमाला रत्नागिरीतील जीएफ प्लस कंपनी आणि जीएफ प्लस वॉटर फाउंडेशन (स्वित्झर्लंड) यांच्या प्रतिनिधींनी भेट दिली. या वेळी त्यांनी संस्थेच्या कार्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
निराधार आणि गरजू वृद्धांसाठी हसते-खेळते हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने २१ ऑगस्ट २०२१ रोजी या प्रकल्पाची सुरुवात झाली. जीएफ प्लस कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या वृद्धाश्रमाच्या देखण्या इमारतीसाठी भरीव आर्थिक मदत केली आहे. या मदतीमुळेच आज आजी-आजोबांसाठी सर्व सोयींनी युक्त अशी सुसज्ज इमारत उभी राहू शकली आहे. या भेटीदरम्यान स्वित्झर्लंड येथील जीएफ प्लस वॉटर फाउंडेशनच्या ली सेरा, कंपनीचे वरिष्ठ सदस्य मनोज भारद्वाज, नम्रता कांबळी आणि अनिकेत यांनी प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली. ली सेरा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ‘समाजाने निराधार सोडलेल्या वृद्धांना सुरक्षित निवारा आणि सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे, हे दयाळूपणाचे आणि अत्यंत कौतुकास्पद कार्य आहे.’ यावेळी त्यांनी आजी-आजोबांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा सहकार्याचा हात पुढे केला.
अरुणा पाटील आणि देवेंद्र पाटील यांनी १३ ऑक्टोबर १९९३ रोजी ‘भाकर’ची स्थापना केली. गेल्या तीन दशकांपासून ही संस्था शेती, आरोग्य, शिक्षण आणि महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अक्षय प्रकल्प, खाण कामगारांच्या मुलांसाठी बालवाड्या, गुजरात भूकंप मदतकार्य आणि जलजीवन मिशन अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांनंतर आता ‘आजी-आजोबांचा गाव’ हा प्रकल्प निराधार वृद्धांसाठी आधारवड ठरत आहे. या वेळी संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते निकिता कांबळे, पारस पोवार, शीतल धनावडे, सुरभी वाडेकर, ज्योती परब आणि आश्रमातील सर्व आजी-आजोबा उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT