22688
सर्जेकोट ः ज्येष्ठ मच्छीमार दादा सावजी यांनी आयसीयूमधून येत मतदानाचा हक्क बजावला.
‘आयसीयू’मध्ये असूनही
बजावला मतदानाचा हक्क
मच्छीमार नेत्याची कर्तव्यनिष्ठा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ : ‘लोकशाहीचा उत्सव’ केवळ शब्दांत नसून तो कृतीत कसा असावा, याचा वस्तुपाठ सर्जेकोट येथील ज्येष्ठ मच्छीमार दादा सावजी यांनी घालून दिला आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे आयसीयूमध्ये उपचार घेत असतानाही केवळ आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी त्यांनी थेट रुग्णवाहिकेतून मतदान केंद्र गाठले. त्यांच्या या अगम्य उत्साहाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दादा सावजी हे शहरातील एका खासगी रुग्णालयात तीन दिवसांपासून हृदयविकाराच्या त्रासामुळे आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा त्यांनी ठाम निश्चय केला होता. त्यांनी आपली इच्छा कुटुंबीय आणि रविकिरण तोरसकर यांच्याकडे व्यक्त केली. प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांची रीतसर परवानगी मिळवली. त्यानंतर सर्व वैद्यकीय खबरदारी घेऊन त्यांना शहरातून सर्जेकोट येथील मतदान केंद्रावर आणले.
जेव्हा ते मतदान केंद्रावर पोहोचले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकारी, कर्मचारी आणि मतदारांनी त्यांचे स्वागत टाळ्यांच्या कडकडाटात केले. आजारी असूनही राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या या वृद्ध योद्ध्याचे धैर्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. सर्जेकोट सरपंच नीलिमा परुळेकर, मतदान केंद्र अध्यक्ष डॉ. सुमेधा नाईक, रविकिरण तोरसकर व सावजी कुटुंबीय यांनी त्यांना सहकार्य केले. मी जर या अवस्थेत येऊन मतदान करू शकतो, तर तंदुरुस्त नागरिकांनी घरात बसून राहू नये. प्रत्येकाने मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन यावेळी सावजी यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.