-rat१०p३८.jpg-
२६O२३७१२
शेखर घोसाळे
-------
ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख
शेखर घोसाळे यांचा राजीनामा
पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली ; नेतृत्व गमावले
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये रत्नागिरी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्याकडे दिला आहे. यामुळे ठाकरे शिवसैनिकांमध्ये संभ्रम असून कार्यकर्त्यांनी आणखी एक नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
शिवसेना उबाठामधून अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु सर्वसामान्य शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेसोबत असल्याचे नुकत्याच लागलेल्या निकालावरून दिसून आले. ठाकरेंचे अनेक उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत झाले; परंतु एकतर्फी लढत होऊ दिली नाही. प्रमुख नेते मंडळी तालुक्यात फिरलेली नसतानाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मशालीचा झेंडा खांद्यावर घेत ग्रामीण भाग पिंजून काढला होता. जवळपास ४५ हजाराहून अधिक मते ठाकरेंच्या सेनेने रत्नागिरी तालुक्यात मिळवली. म्हणजेच ठाकरे शिवसेना मानणारी आजही शिवसैनिक मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात असल्याचे या निवडणुकीत दिसून आले.
तालुकाप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेखर घोसाळे यांनी तालुक्यात चांगल्या पद्धतीने बांधणी करण्यास सुरुवात केली होती. पदाधिकारी व शिवसैनिकांना विश्वासात घेत ठाकरेंच्या या लढवय्या कार्यकर्त्याने तालुक्यात शिवसेनेची होणारी पडझड थांबवली होती; मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याने शेखर घोसाळे यांनी नैतिक जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्याकडे दिला आहे.
-------------
कोट
आपण ठाकरेप्रेमी असून, यापुढे शिवसैनिक म्हणून काम करू; मात्र कोणत्याही अन्य पक्षात जाण्याचे आपल्या मनातही येणार नाही. सर्वसामान्य शिवसैनिक तालुक्यात अजून ठाकरेंच्या बाजूने आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच पक्षाचे काम प्रामाणिक करू.
- शेखर घोसाळे, ठाकरेसेना तालुकाप्रमुख, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.