कोकण

निळ्या, लाल पूररेषांचे होणार फेरसर्वेक्षण

CD

निळ्या, लाल पूररेषांचे होणार फेरसर्वेक्षण
नगरविकास खात्याचे आदेश ; समिती स्थापन; चिपळूण, खेडमधील स्थानिकांचा समावेश नाही
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. 12 : राज्यभरातील पूरबाधित शहरांमध्ये नद्यांलगत मारलेली निळ्या व लाल पूररेषांचे फेरसर्वेक्षण करण्यासाठी तसेच पूरबाधित क्षेत्राचा पुनर्विकास करण्यासाठी नियमावली तयार केली आहे. त्याच्या अभ्यासासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे.
नगरविकास खात्याने त्यासाठी अध्यादेश जारी केला आहेत. या समितीमध्ये 12 लोकांचा समावेश आहे; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व चिपळूण येथील एकाचाही त्या समितीमध्ये समावेशच करण्यात आलेला नाही.
राज्यातील नद्यांलगत असणाऱ्या शहरांमध्ये निळी व लाल पूररेषा पाटबंधारे खात्यामार्फत आखण्यात आल्या होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, राजापूर, संगमेश्वर ही शहरे पूरबाधित आहेत. या ठिकाणी लाल व निळी पूररेषा आखल्याने विकासावर परिणाम झाला होता. त्याच पद्धतीने राज्यभरातील पूरबाधित शहरांची ही समस्या होती. या अनुषंगाने शासनाकडे मागण्या होत होत्या. अखेर 10 तारखेला नगरविकास विभागाने पुनःसर्वेक्षण करण्यासाठी समिती गठित केली आहे. यामध्ये पुनःसर्वेक्षण करणे, पूररेषाबाधित क्षेत्रातील अधिकृत इमारतींचा, जुन्या सोसायटींचा पुनर्विकास प्रस्तावामध्ये टीडीआरसहित बांधकाम परवानगी मिळण्यासाठी तातडीची उपाययोजना व कार्यवाही, विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली आहे.
या समितीमध्ये नगरविकास विभाग, जलसंपदा विभाग, पर्यावरण विभाग, मृद व पुनर्वसन विभागाचे अप्पर सचिव, प्रधान सचिव किंवा सचिव यांचा सहभाग आहे तसेच संजीव टाटू, महासंचालक मेरी नाशिक संकलन प्रशिक्षण जलविज्ञान संशोधन व सुरक्षितता, नगररचना विभाग पुणेचे संचालक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, कोल्हापूर, चंद्रपूर महानगरपालिकांचे आयुक्त, नगररचना पुणे विभागाचे सहसंचालक, महाड व बदलापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांचा या समितीत समावेश आहे; मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील पूरबाधित एकाही शहरातील सदस्य या समितीत घेण्यात आलेला नाही. ही समिती राज्यातील ज्या शहरांमध्ये निळ्या व लाल पूररेषांचा विषय अडचणीचा ठरत आहे अशा ठिकाणी नव्याने सर्वेक्षण करण्याचे व पुरामुळे बाधित होणारे क्षेत्र व जीवित, मालमत्तेचे होणारे नुकसान याबाबत शासनाला उपाय सुचवतील. ही समिती नद्यांलगत असलेल्या जागेवरील परिस्थिती, भविष्यातील विकास या मुद्द्यांचा विचार करून शासनाला उपाययोजना सुचवेल तसेच पूरबाधित क्षेत्रातील बांधकामांची संख्या, जोते, पातळी, नदीची वहनक्षमता, प्रवाहाची दिशा या तांत्रिक मुद्द्यांचा विचार करून शासनाला अभिप्राय देईल.

दोन महिन्यात अहवाल सादर
समितीने आवश्यकतेनुसार माहितगार व्यक्ती, तज्ज्ञ संस्था यांना बैठकीला बोलावून माहिती घ्यावयाची आहे व आवश्यक त्या शिफारशी तयार करून अहवाल दोन महिन्यांमध्ये शासनाला मान्यतेसाठी सादर करावयाचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT