कोकण

जिल्हा रुग्णालयात ६ महिन्यांपासून युनानी औषधांचा तुटवडा

CD

जिल्हा रुग्णालयात ‘युनानी’ औषधांचा तुटवडा
‘आयुष’ विभागाचा कारभार कोलमडला ; रुग्णांची सहा महिने होतेय ससेहोलपट
सकाळ वृत्तसेवा
​रत्नागिरी, ता. १२ : जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘आयुष’ विभागाचा कारभार सध्या पूर्णपणे कोलमडला असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या विभागातील ‘युनानी’ औषधांचा मोठा तुटवडा भासत आहे. उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना औषधांविना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. एकीकडे सरकार पर्यायी औषधोपचार पद्धतीचा प्रचार करत असताना, प्रत्यक्षात मात्र औषधांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत.
जिल्हा रुग्णालयातील या विभागात रोज सरासरी १० ते १५ रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयात ‘युनानी तज्ज्ञ डॉक्टर’ वेळेवर ओपीडीमध्ये उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करत आहेत; मात्र, औषधेच उपलब्ध नसल्याने केवळ सल्ला देण्यापलीकडे डॉक्टरांच्या हातात काहीही उरलेले नाही. युनानी औषधे खासगी मेडिकल स्टोअर्समध्ये सहजासहजी मिळत नाहीत, त्यामुळे ‘तपासणी करून औषधे आणायची कुठून?’ असा संतप्त सवाल रुग्ण विचारत आहेत. ग्रामीण भागातून अनेक रुग्ण पदरमोड करून, प्रावासीभाडे खर्च करून जिल्हा रुग्णालयात येतात; मात्र, येथे आल्यावर औषधे मिळत नसल्याने त्यांना मानसिक त्रासासोबतच त्यांना आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्यांचा आधार असलेला हा दवाखाना केवळ नावापुरताच उरला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा द्यावा, अशीही मागणी होत आहे.
---
चौकट...
नागरिकांचा रोष
प्रशासनाचे उत्तर तांत्रिकदृष्ट्या बरोबर असले तरी तब्बल १८० दिवस (सहा महिने) औषधे उपलब्ध नसणे हे आरोग्य विभागाचे मोठे अपयश मानले जात आहे. वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात स्थानिक प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आता या गंभीर विषयावर वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन रत्नागिरीकरांना या त्रासातून कधी मुक्त करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
-------------
कोट...
‘युनानी’ औषधांचा पुरवठा राज्यस्तरावरून केला जातो. सध्याचा साठा संपला असून, नवीन पुरवठा अद्याप झालेला नाही. राज्यस्तरावरून औषधे प्राप्त होताच ती तातडीने रुग्णांना उपलब्ध करून दिली जातील. तसे शासनाला कळवले आहे.
- डॉ. भास्कर जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT