swt123.jpg
24046
आंबेगाव ः स्काऊट राज्य पुरस्कार चाचणीत यश मिळविवेल्या विद्यार्थ्यांसोबत मान्यवर.
आंबेगाव, कुणकेरी विद्यालयाचे
स्काऊट पुरस्कार चाचणीत यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः राज्य प्रशिक्षण केंद्र, सोनतळी (जि. कोल्हापूर) येथे झालेल्या स्काऊट राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात आंबेगाव शाळा क्र. १ च्या छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट पथकातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. आंबेगाव शाळेचे स्काऊट मास्टर नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट पथकातील विद्यार्थी तनिश गावडे आणि आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय कुणकेरी येथील प्रवीण जंगले, भावार्थ झोरे, आर्यन गावडे (आठवी) या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण करत शाळेमधून स्काऊट राज्य पुरस्कार चाचणी पहिल्यांदा उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला.
त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सरपंच शिवाजी परब, उपसरपंच रमेश गावडे, मुख्याध्यापक प्रदीपकुमार म्हाडगुत, कुणकेरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा तेजस्वी गावडे, कोलगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख भावना गावडे, कोलगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा स्काऊट मास्टर अरविंद मेस्त्री, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. या राज्यस्तरीय यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.