कोकण

शिवलकर यांचा सत्कार

CD

rat१२p१०.jpg-
२६O२४०३५
येवला : अनुलोम संगम कार्यक्रमात रत्नागिरीतील तनया शिवलकर यांचा सन्मान करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
--------
तनया शिवलकर यांचा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : अनुगामी लोकराज्य अभियान अर्थात् अनुलोमच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग उपविभाग जनसेविका तनया शिवलकर यांचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात सांघिक उत्तम कामगिरी म्हणून कोकण विभागातील भिवंडी उपविभागातील सर्व जनसेवकांना सन्मान करण्यात आले.
येवला (नाशिक) येथील कापसे फाउंडेशन येथे अनुगामी लोकराज्य अभियान यांच्यावतीने आयोजित अनुलोम संगम कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. या वेळी अनुलोम प्रांतप्रमुख स्वानंद ओक, सहप्रमुख सुजाता मराठे, मुख्यमंत्री यांनी ओएसडी अतुल वझे, कोकण विभाग पालक प्रेरणा पवार, कोकण विभागप्रमुख रवींद्र भोवड व महाराष्ट्रातील सर्व जनसेवक उपस्थित होते.
या वेळी फडणवीस म्हणाले, देशविकासासाठी समर्पणाची भावना अत्यंत महत्त्वाची आहे. अनुलोमचे स्वयंसेवक याच भावनेतून कार्य करत आहेत, ही बाब प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांनी मांडलेल्या विचारांनुसार, समाजातील अडचणी दूर करण्याचे कार्य अनुलोमच्या माध्यमातून प्रभावीपणे होताना दिसत आहेत. चांगली समाजनिर्मिती हीच या कार्यामागील प्रेरणा आहे. समाजात अनुलोमच्या प्रत्येक स्वयंसेवकाचे योगदान महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमादरम्यान पद्मश्री श्रीरंग लाड, कापसे पैठणी उद्योगसमूहाचे संस्थापक बाळकृष्ण कापसे तसेच अनुलोमच्या कार्यात योगदान देणाऱ्या कोकण विभागातील भिवंडी उपविभागातील मुरबाड भाग जनसेवक दिनेश भावार्थे, भिवंडी पश्चिम भाग जनसेवक राजेश पाठारे, कुडाळ भाग जनसेवक बाजीराव काळे तसेच भिवंडी उपविभाग जनसेवक प्रकाश लसणे यांना सन्मानित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : जिंतूरजवळ अकोली पुलावर भीषण अपघात; गंगाखेडचे चार तरुण जागीच ठार

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT