कोकण

आंबा बागेतील फळधारणा, रोगाचे सर्वेक्षण

CD

-rat१२p४.jpg-
P२६O२४०३६
पावस ः मावळंगे येथील बागायतदार विलास देशमुख यांच्या बागेमध्ये पाहणी करताना कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे आणि अधिकारी.
-----
आंबा बागेतील फळधारणा, रोगाचे सर्वेक्षण
कृषी विद्यापीठाचा उपक्रम : बागायतदारांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १२ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आंबाबागांच्या सद्यःस्थितीचे सर्वेक्षण करण्यासाठी पावस पंचक्रोशीतील बागांना भेटी देण्यात आल्या. यामध्ये आंबाप्रक्षेत्रावर आंबापिकाची मोहोरगळती, फळधारणा, कीड व रोग प्रादुर्भाव तसेच चालू हंगामातील वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने आंबाबागांच्या सद्यःस्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले.
वायंगणीतील शेतकरी उपेंद्र जोशी, कोळंबेमधील दीपक मोरे, गोळप येथील उमंग साळवी, पावसमधील शफी हमदरे, मावळंगेतील विलास देशमुख, झरेवाडीतील प्रमोद सकरे, मधुसूदन देसाई, हातखंबा येथील मनोज नाचणकर आदींच्या आंबाबागांची पाहणी करण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान कीडरोगांची स्थिती, बागायतदारांनी केलेली फवारणी, सद्यःस्थितीतील फळधारणा, झालेला खर्च, हवामान बदल याबाबत बागायतदारांशी चर्चा करण्यात आली. या वेळी भाट्ये येथील कृषी विद्यावेत्ता डॉ. किरण मालेशे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडळ कृषी अधिकारी सागर मासाळ, सहाय्यक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर राऊत, कृषीसेवक दीपाली साळुंके, अजय कल्याणकर आणि गावातील शेतकरी उपस्थित होते.
मावळंगे येथील बागायतदार विलास देशमुख म्हणाले, आंबाबागेमध्ये पडणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भाबाबत योग्य दखल घेऊन त्या संदर्भात फवारणी नियोजनबद्ध करतो तसेच बागेची साफसफाई योग्य तऱ्हेने करत असल्यामुळे येणारे पीक चांगल्या दर्जाचे येते. त्यामुळे फळधारणा चांगली झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT