-rat१२p१८.jpg-
२६O२४०७३
रत्नागिरी ः निष्पाप कलानिकेतन संस्थेने सादर केलेल्या ‘मी कुमार’ या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
------
मनातील द्वंद्वाची शोकांतिका ‘मी कुमार’
निष्पाप कलानिकेतन संस्थेचा प्रयत्न; अभिनय, नेपथ्याला रसिकांचा प्रतिसाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ः उच्च मध्यमवर्गीय कुटुंब आणि त्यांच्यातील अंतर्गत नातेसंबंधातील ताणतणावामुळे निर्माण झालेले द्वंद्व ‘मी कुमार’ या नाटकात मांडण्यात आले आहे. लेखक विजय तेंडुलकर, दिग्दर्शक अभिजित फाटक यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे नाटक निष्पाप कलानिकेतन-इचलकरंजी या संस्थेने सादर केले. कौटुंबिक नातेसंबंध आणि प्रेम यावर प्रकाश टाकणारी ही कहाणी होती.
-------
‘मी कुमार’ या नाटकाची सुरुवात एका घरातील पार्टीने होते. ‘अमर–सुधा’ यांच्या घरी पार्टी सुरू असून, यामध्ये निशा आणि हर्षद, केतन आणि अभिलाषा हे पती-पत्नी, बिपिन ही मित्रमंडळी जमलेली आहेत. या पार्टीत ‘कुमार’ उपस्थित नसतो. त्या वेळी बिपिन कुमारने आत्महत्या केल्याचे सांगतो; मात्र काहींना त्याचा खून झाल्यासारखे वाटत असते. त्यामुळे ते सत्य शोधण्याचा निर्धार करतात. कुमार कोलकात्यात राहणारा अभ्यासू आणि शांत स्वभावाचा तरुण असतो. तो नेहमी अभ्यासात गुंतलेला असतो. त्या वेळी निशा कुमारला भेटायला येते आणि कुमारसमोर आपलं प्रेम व्यक्त करते. त्यामुळे कुमार अस्वस्थ असतो. कारण, निशा ही त्याची वहिनी असते. त्या वेळी तो निशाला सांगतो की, आपण भाऊ हर्षदला फसवतो आहोत; पण कुमारही नकळत तिच्या गुंतलेला असतो. एकीकडे त्याचे मन निशामध्ये गुंतले असते, पण त्याचवेळी त्याला आपल्या भावाचाही विचार येतो. त्यामुळे कुमार अस्वस्थ असतो. हे सर्व पार्टीत बिपीनने सांगितल्यानंतर निशा आपले कुमारवर प्रेम असल्याचे कबूल करते. तसेच हर्षदही कुमार आणि निशाच्या मैत्रीबद्दल आपल्याला माहिती असल्याचे सांगतो. त्यावेळी कुमारच्या आत्महत्येमागील रहस्य उलगडते.
---
* सूत्रधार आणि सहाय्य
लेखक ः विजय तेंडुलकर, दिग्दर्शक ः अभिजित फाटक, निर्मिती ः विजयानंद लंबे, सुत्रधार ः अंकुश गरगटे, नेपथ्य ः ओंकार चौगुले, प्रताप डोंगरे, प्रकाशयोजना ः आशिष भागवत, पार्श्वसंगीत अनुजा कुलकर्णी, वेशभूषा ः स्नेहा वर्मा, रंगभूषा ः सुनीता वर्मा. रंगमंच व्यवस्था ः निखिल पोवार, गौरव खानाज, राजश्री गोगंडी, अनिलकुमार सोनटक्के, प्रतीक हुंद्रे, रोहित पाटील, जानव्ही काटू, अंजली गोंगडी, राजू गायकवाड.
----
* पात्र परिचय
अमर ः विजयानंद लंबे, सुधा ः वैष्णवी हळदे, हर्षद ः अनिरुद्ध भागवत, नीशा ः स्नेहल बंडगर, केतन ः जॉयलुईस रॉड्रिग्युस, बिपिन ः हितेश दायमा, अभिलाषा ः आसावरी झिरमिटे, कुमार ः हर्षवर्धन कारंडे-देशमुख.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.