कुणकेश्वर यात्रा यंदा प्लास्टिक मुक्त
रवींद्र खेबुडकर : जिल्हा परिषदेचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता.१३: आंगणेवाडी यात्रोत्सवानंतर होऊ घातलेल्या कुणकेश्वर यात्रोत्सव प्लास्टिक मुक्त असणार आहे. याबाबतचे नियोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत व तालुकास्तरावर केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आज ही माहिती दिली.
सिंधुदुर्ग प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रचार प्रसिद्धी व्हावी या हेतुने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्या माध्यमातून शालेय स्तरावर प्लास्टिक व ई वेस्ट संकलन स्पर्धा, मंदिर व मंदिर परिसर स्वच्छता, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र आरोग्य उपकेंद्र, शाळा व शाळा परिसर स्वच्छता कार्यक्रम, समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम आदीचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सव प्रसिद्ध आहे. यात लाखो भाविक, व्यापारी हजेरी लावत असतात. त्यामुळे या भागात मोठ्याप्रमाणात जैविक व प्लास्टिक कचरा तयार होत असतो. १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान कुणकेश्वर येथे होत असलेल्या यात्रोत्सवात प्लास्टिक मुक्त संकल्पना राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या सुचना देवगड गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यात्रोत्सव काळात प्लास्टिक मुक्तीसाठी व्यापक प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यात्रोत्सवात काळात मंदिर व परिसरात कचरा कुंड्याचे नियोजन करण्यात येणार आहे. हॉटेल व फुड स्टॉल यांना जैविक व प्लास्टिक कचरा गोळा करण्याकरीता कचरा कुड्या किंवा निळ्या व हिरव्या रंगाच्या गारबेज बॅग पुरवण्यात येणार असुन जमा होणारा कचरा त्यांनी एकत्र करुन ठेवावयाचा आहे. यात्रोत्सवाच्या ठिकाणी जैविक कचरा एकत्र करुन योग्य विल्हेवाट लावण्याकरीता ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन ठिकठिकाणी तातपुरत्या स्वरुपाचे कंपोष्ट खड्डे तयार करण्यात येणार आहे.
----
स्वच्छता कर आकारणार!
यात्रोत्सवात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून यात्रा करांप्रमाणे स्वच्छता कर आकारण्यात येणार आहे. तसेच पंचायत समिती व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्लास्टिक बंदी अधिनियमाप्रमाणे सिंगल युज प्लास्टिक आढळल्यास दंडाची तरतुद करुन रितसर दंड आकारण्यात येणार आहे. सिंधुदुर्गवासिय, भाविक व व्यापाऱ्यांनी आपला सिंधुदुर्ग प्लास्टिक मुक्त करण्याकरीता पुढाकार घेऊन प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. खेबुडकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.