धाराशिव जिल्ह्यात कांदा पिकामध्ये अफूची लागवड केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वाशी उपतालुकाप्रमुख समाधान उघडे यांच्या शेतातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ४८५ किलो अफूची झाडे जप्त केली.
या बेकायदेशीर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून संघटनात्मक शिस्तीला धक्का बसल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. उपजिल्हाप्रमुख प्रदीप मेटे यांनी अधिकृत पत्रकाद्वारे ही कारवाई जाहीर केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार समाधान उघडे यांना पक्षातून काढण्यात आल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.