कोकण

शिडवणे शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध

CD

24699

शिडवणे शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध

रवींद्र शेट्ये ः सभागृह लोकार्पण, स्नेहसंमेलन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १५ : शिडवणे क्र. १ शाळेच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावण्याबरोबरच सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये यांनी केले. ते शाळेच्या नूतन वर्गखोल्या व सभागृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे क्र. १ शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, याचा भव्य लोकार्पण सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात झाले. याप्रसंगी नूतनीकरण केलेल्या दोन नवीन वर्गखोल्यांचे आणि छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण केले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, वारगाव सरपंच नानासाहेब शेट्ये, शिडवणे उपसरपंच दीपक पाटणकर उपस्थित होते. शाळेच्या व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्यावतीने सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा मांडला.
​या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना चषक देऊन गौरविले. ‘ज्ञानकुंज’ मासिकाचे प्रकाशन आणि शिडवणे गावाची माहिती देणाऱ्या ‘विकीपीडिया क्यूआर कोड’चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वामी समर्थ मठ ट्रस्टचे सुरेश कदम व गौरांग कदम यांच्या सहकार्याने आणि गोविंद वाघरे यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. ‘आदर्श विद्यार्थी’ व आदर्श शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले. पोलिसपाटील समीर कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया पांचाळ, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पांचाळ, अभियंता प्रथमेश पाताडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे उपस्थित होते. मुख्याध्यापक प्रवीण कुबल, वेदिका चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सुरेंद्र यादव व हेमा वंजारी यांनी आभार मानले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुणदर्शनपर कार्यक्रम झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : हस्तांदोलन नाहीच! भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये दोन बदल; पाकिस्तानला टॉसच्या वेळीच दिला दम

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

IND vs PAK : जय शाह यांचा 'Dhurandhar' प्लान! पाकड्यांना त्यांची जागा दाखवण्याची सोडणार नाही संधी, सामन्यापूर्वीच होणार 'गेम'

नवरा असावा तर असा ! बायकोसाठी हार्दिकने पाहिलंय 'हे' स्वप्न; "तिने राणीसारखं मोठ्या गाडीत बसावं आणि मी.."

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

SCROLL FOR NEXT