कोकण

पुरातन मंदिरातून घुमला शिवशंभोचा गजर

CD

rat15p9.jpg-
24649
संगमेश्वर ः येथे शिवलिंगपूजन करताना पूजारी.

पुरातन मंदिरातून घुमला शिवशंभोचा गजर
कर्णेश्वर, सोमेश्वर, रामेश्वर मंदिरात कार्यक्रम ; दर्शनासाठी भक्तांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ : संगमेश्वर तालुक्यातील पुरातन व चालुक्य राजवटीतील शिवमंदिरांमध्ये रविवारी महाशिवरात्रीनिमित्त ''शिवशंभो''चा जयघोष घुमला. यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कळंबस्ते साटलेवाडी येथील श्री रामेश्वर पंचायतन मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासूनच विधीवत अभिषेक आणि आरती संपन्न झाली. साटलेवाडी समाजसेवा आणि मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने या निमित्ताने सामाजिक उपक्रमावर भर देण्यात आला होता. डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाच्या सहकार्याने परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य सुविधेचा लाभ अनेक ग्रामस्थांनी घेतला. समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच कसबा येथील ऐतिहासिक व चालुक्यकालीन श्री कर्णेश्वर मंदिरातही महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. विशेष म्हणजे, पावसाळ्यात मंदिराचा कळस गळत असल्याने पुरातत्व विभागाने पश्चिम बंगाल येथील कारागिरांकडून कळसाच्या नूतनीकरणाचे काम नुकतेच दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेतले आहे. याबद्दल कर्णेश्वर देवस्थान समितीच्या वतीने पुरातत्व विभागाचे आभार मानण्यात आले. तालुक्यातील या पुरातन मंदिरांमध्ये दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EOL Vehicle: जुन्या वाहनधारकांना मोठा धक्का! १० वर्षांची डिझेल, १५ वर्षांची पेट्रोल कार होणार थेट जप्त; राज्य सरकारचा कडक निर्णय

IND vs PAK :'हस्तांदोलन' न करणे हा भारताने सुरू केलेला मुर्खपणा! Sanjay Manjrekar यांची वादग्रस्त पोस्ट; काहींचा सपोर्ट, तर काही विरोधात; तुमचं काय मत?

Education: अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षणात मूलभूत सुधारणेसाठी तरतूद करा; महायुती सरकारकडे शिफारस

अनैसर्गिक शरीर संबंध, व्हिडिओ बनवला अन्...; ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं १२ वर्षीय मुलासोबत नको ते कृत्य, घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : जमिनीच्या वादातून हाणामारी, पोलिसांनी केली मध्यस्थी

SCROLL FOR NEXT