कोकण

मराठी तरुणांनी उद्योग क्षेत्रात यावे

CD

24707

मराठी तरुणांनी उद्योग क्षेत्रात यावे

अभिनव बेर्डे ः सावंतवाडीत वैश्यवाणी युवा संघटना स्थापन सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः माझे वडील अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी संपूर्ण सिनेसृष्टीला व्यवसाय कसा करायचा, हे शिकवलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ त्यांना ‘पक्का वाणी’ म्हणायचे. व्यवसाय, उद्योगात मराठी युवा मंडळी येऊन मराठी माणूस व्यवसायात मोठा होताना दिसावा, अशी भावना अभिनेते अभिनव बेर्डे यांनी व्यक्त केली. येथे आयोजित हिंदू वैश्यवाणी युवा संघटना स्थापनेच्या निमित्ताने आयोजित शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते.
अभिनेते श्री. बेर्डे म्हणाले, ‘‘समाजाचा पहिलाच मोठा कार्यक्रम आज पाहता आला. मुंबईसारख्या ठिकाणी वैश्य समाज कुठे एकत्रित दिसला नाही. असे कार्यक्रम तिथे होत नाही, परंतु आज सिंधुदुर्गात ते बघायला मिळाले. युवा संघटना स्थापना होत आहे, ही माहिती मिळताच मी सावंतवाडीत आलो. सगळ्यांना माझा पाठिंबा आहे.’’
सावंतवाडी वैश्य भवन येथे हिंदू वैश्यवाणी युवा संघटना स्थापनेच्या निमित्ताने शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यानंतर अभिनेता अभिनय बेर्डे यांच्या हस्ते संघटनेचा प्रारंभ करण्यात आला. हिंदू वैश्यवाणी युवा संघटना स्थापन झाल्याची घोषणा अभिनेता श्री. बेर्डे यांनी केली. युवा संघटना अध्यक्षपदी अमित गवंडळकर यांची निवड केल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष श्री. भोगटे यांनी केली. याप्रसंगी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, वैश्यवाणी संघटना जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, तालुकाध्यक्ष रमेश बोंद्रे, महिलाध्यक्षा तनुजा पोकळे, वेंगुर्ले उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सुनील कोरगावकर, दीपलक्ष्मी पडते, रमेश भाट, बाबा टोपले आदी उपस्थित होते.
यावेळी समाजातील नवनिर्वाचित कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, वेंगुर्ले उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा परिषद सदस्या दीपलक्ष्मी पडते, सावंतवाडी नगरसेवक आनंद नेवगी, सुकन्या टोपले, प्रतीक बांदेकर, कणकवली नगरसेवक जाई मुरकर, वेंगुर्ले नगरसेवक रवींद्र शिरसाट, आंब्रड पंचायत समिती सदस्य नितीन महाडेश्वर, विलवडे पंचायत समिती सदस्य प्रशांत सुकी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. राजेश गुप्ता, बाळासाहेब बोर्डीकर, प्रा. विकास गोवेकर, कल्पना बांदेकर, सागर बांदेकर, ओवी भिसे, नील बांदेकर, गौरांग भाट, जतीन भिसे, राजदीप बांदेकर, जुईली पांगम, मंदार नार्वेकर, डॉ. प्रसाद नार्वेकर, कीर्ती बोंद्रे, पुष्पलता कोरगावकर, सानिका कोदे, उमा टिळवे शिरसाट, शशिकांत नेवगी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. युवा संघटना अध्यक्ष गवंडळकर यांनी संघटनेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटलला १० हजार रुपयांची मदत जाहीर केली. उपाध्यक्ष सुनील मिशाळ व समाजबांधव उपस्थित होते. जुईली पांगम, उमा तिळवे शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. सल्लागार अरुण भिसे यांनी आभार मानले.
--------
युवा संघटना महत्त्वाचा टप्पा!
श्री. केसरकर यांनी, हिंदू वैश्यवाणी युवा संघटना म्हणजे समाजातील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. युवकांमध्ये उर्जा असून त्यांच्यातील उर्जा चांगल काम घडवेल. उद्योजक घडविण्याचे काम आपल्या माध्यमातून होईल, असा विश्वास व्यक्त केला. माजी आमदार राजन तेली यांनी, व्यापार, उद्योग कसा वाढेल, याकडे यासाठी युवा संघटनेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. आनंद नेवगी, दीपलक्ष्मी पडते, संदेश पारकर यांनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EOL Vehicle: जुन्या वाहनधारकांना मोठा धक्का! १० वर्षांची डिझेल, १५ वर्षांची पेट्रोल कार होणार थेट जप्त; राज्य सरकारचा कडक निर्णय

IND vs PAK :'हस्तांदोलन' न करणे हा भारताने सुरू केलेला मुर्खपणा! Sanjay Manjrekar यांची वादग्रस्त पोस्ट; काहींचा सपोर्ट, तर काही विरोधात; तुमचं काय मत?

Education: अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षणात मूलभूत सुधारणेसाठी तरतूद करा; महायुती सरकारकडे शिफारस

अनैसर्गिक शरीर संबंध, व्हिडिओ बनवला अन्...; ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं १२ वर्षीय मुलासोबत नको ते कृत्य, घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : जमिनीच्या वादातून हाणामारी, पोलिसांनी केली मध्यस्थी

SCROLL FOR NEXT