कोकण

‘मदर क्विन्स’ स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना आरोग्याचे धडे

CD

24748

‘मदर क्विन्स’ स्कूलमध्ये
विद्यार्थ्यांना आरोग्याचे धडे

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील मदर क्विन्स इंग्लिश स्कूलमध्ये सहावी ते आठवीच्या मुलांसाठी मानसिक, भावनिक व शारीरिक स्वास्थ्यविषयक मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजशेखर कार्लेकर यांनी कुमारवयीन मुलांच्या सर्वांगीण विकासावर सखोल मार्गदर्शन केले. ​
डॉ. कार्लेकर यांनी प्रामुख्याने कुमारवयातील मुलांमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल आणि त्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यावर प्रकाश टाकला. सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर होणारे दुष्परिणाम त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले. ​या उपक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, श्रद्धाराजे भोसले, मंडळाचे संचालक दिलीप देसाई यांनी कौतुक केले. मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : हस्तांदोलन नाहीच! भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये दोन बदल; पाकिस्तानला टॉसच्या वेळीच दिला दम

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

IND vs PAK : जय शाह यांचा 'Dhurandhar' प्लान! पाकड्यांना त्यांची जागा दाखवण्याची सोडणार नाही संधी, सामन्यापूर्वीच होणार 'गेम'

नवरा असावा तर असा ! बायकोसाठी हार्दिकने पाहिलंय 'हे' स्वप्न; "तिने राणीसारखं मोठ्या गाडीत बसावं आणि मी.."

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

SCROLL FOR NEXT