24766
गुणवत्ता हीच सिंधुदुर्गाची खरी ओळख
पुष्कराज कोले ः वायंगणी-सुरंगपाणी शाळेच्या इमारतीचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १५ ः सिंधुदुर्गाचा खरा विकास शिक्षण क्षेत्रामुळेच झाला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये जिल्हा सातत्याने गेली पंधरा वर्षे पहिल्या नंबरवर आहे. ज्या शिक्षकांनी मुलांना घडवले, त्यांच्यावर संस्कार केले, त्यांच्यामुळे विद्यार्थी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवितात. शाळेचे ऋण स्मरणात ठेवून पुढे चालत राहिलात तर सिंधुदुर्गाची प्रगती अग्रगण्य होईल, असे प्रतिपादन उद्योजक पुष्कराज कोले यांनी वायंगणी-सुरंगपाणी शाळा नूतन इमारत लोकार्पणप्रसंगी काढले.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा शाळा वायंगणी-सुरंगपाणी शाळा इमारत उद्घाटन सोहळा व माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी श्री. कोले यांच्या हस्ते देवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पंचायत समिती सदस्य शीतल राऊत, वायंगणी सरपंच दत्ताराम दुतोंडकर, वेंगुर्ले पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, वायंगणी-सुरंगपाणी शाळेच्या मुख्याध्यापिका शामल मांजरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित कोरगावकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा वैष्णवी पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य विनू मठकर, विद्या गोवेकर, राखी धोंड, पत्रकार योगेश तांडेल, प्रवीण राजापूरकर, शुभांगी खानोलकर, प्रसाद खानोलकर आदी उपस्थित होते.
संस्थापिका (कै). चंपूताई वायंगणकर यांच्या तैलचित्राचे अनावरण गटशिक्षणाधिकारी गोसावी व शीतल राऊत यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. प्रेमानंद कोचरेकर, बाबाजी येरम, दीपा वेंगुर्लेकर, सखाराम तांडेल, स्मिता प्रभू, बाबुराव कांबळी, श्रीधर गोवेकर, अर्चना देसाई या निवृत्त शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. शैलेश तांबे यांनी सूत्रसंचालन केले. शामल मांजरेकर यांनी प्रास्ताविक केले. रुचिता सोळंके यांनी आभार मानले. यावेळी आजी-माजी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.