कोकण

रत्नागिरी- डिपेक्स अंतर्गत २५ नवीन कल्पना सादर

CD

rat15p35.jpg-
24761
रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमीच्या डिपेक्स कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे संचालक (तांत्रिक) रामबाबू संका. सोबत प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद प्रा. शिवराज कांबळे, स्वप्निल सावंत, आयुष पारिख, संकेत सरोदे आदी.
-----
विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व्यासपीठ
‘फिनोलेक्स’मध्ये डिपेक्स; सादरीकरण फेरी संपन्न
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी येथे कोकण विभागासाठी घेण्यात आलेली डिपेक्स २०२६ ची कल्पना सादरीकरण फेरी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कोकण विद्यार्थी ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये कोकणातील ७२ विद्यार्थ्यांच्या २५ नवकल्पनांचे दमदार सादरीकरण झाले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सृजन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डिपेक्स २०२६ ही राज्यस्तरीय प्रदर्शन व स्पर्धा आहे. याचा मुख्य कार्यक्रम ५ ते ८ मार्चदरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक (तांत्रिक) रामबाबू संका उपस्थित होते. त्यांनी उद्योग क्षेत्रातील संधी, संशोधनवृत्ती आणि सातत्यपूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण विचार करण्याचे आवाहन केले.
या वर्षी ग्रामीण विकासासाठी सामाजिक नवोन्मेष आणि विकसित भारत २०४७ अशी संकल्पना ठेवली आहे. ग्रामीण शिक्षण, आरोग्य, शेती, शाश्वत ऊर्जा, कचरा व्यवस्थापन आदी क्षेत्रांतील समस्यांवर अभिनव उपाय शोधणाऱ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण ७२ विद्यार्थ्यांनी २५ नवकल्पनांचे सादरीकरण केले. विविध विषयांवरील बहुआयामी आणि उद्योगाभिमुख संकल्पनांमुळे स्पर्धेला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व रचनात्मक अभिप्राय देण्यात आला. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. संदीप चावडा (डीन – संशोधन व विकास) व प्रा. मिलिंद तगारे यांनी केले.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT