कोकण

शॉर्टसर्किटने झालेल्या हानीची भरपाई न मिळाल्याने उपोषण

CD

24943

शॉर्टसर्किटने झालेल्या हानीची
भरपाई न मिळाल्याने उपोषण

न्हावेलीतील प्रकार, दोन वर्षे प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः विद्युत वाहिनीला शॉर्टसर्किट होऊन आंबा व काजू बागेला आग लागून संपूर्ण बाग जळून खाक झाली. सलग दोन वर्षे हा प्रकार होऊनही अद्याप शासनाकडून एकही रुपयाची नुकसानभरपाई न मिळाल्याने न्हावेली चौकेकरवाडी येथील केशव चौकेकर व आपा चौकेकर यांनी येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
श्री. चौकेकर यांच्या म्हणण्यानुसार, २९ फेब्रुवारी २०२४ तसेच ६ मे २०२५ ला शॉर्टसर्किट होऊन त्यांच्या ५ एकर आंबा व काजू बागेचे मोठे नुकसान झाले. कलमांसह बाग शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाली‌; मात्र दोन वर्षे होऊनही अद्याप त्यांना एकही रुपया नुकसानभरपाई मिळालेली नाही. जवळपास ९० लाखांचे नुकसान या दोन वर्षांत झाले असून केवळ १ लाख ८७ हजार रुपयांची मदत महावितरणकडून देण्याचे आश्वासन दिले जात आहे. या तुटपुंज्या नुकसानभरपाईत पुन्हा बागायत उभी करणे देखील मुश्किल आहे. उपजीविकेचे एकमेव साधन शेती असल्याने एकतर भरपाई द्यावी, अन्यथा महावितरणमध्ये नोकर द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जीर्ण झालेल्या विद्युत यंत्रणेमुळे वारंवार शॉर्टसर्किट होऊन नुकसान होत असल्याने ही यंत्रणा इतर मार्गाने वळवावी, अशी मागणी श्री. चौकैकर यांनी करत बेमुदत उपोषण छेडले आहे.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT