कोकण

प्रशासनातर्फे शिवजंयतीची लगबग

CD

24954

प्रशासनातर्फे शिवजंयतीची लगबग

सावंतवाडी, कणकवलीत उद्यापासून विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि अद्वितीय कार्यकर्तृत्वावर आधारित हा दोन दिवसीय सोहळा १८ व १९ फेब्रुवारीला कणकवली व सावंतवाडी येथे रंगणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते बुधवारी (ता. १८) सायंकाळी ७ वाजता आचरेकर प्रतिष्ठान सभागृह, कणकवली येथे होणार आहे. यावेळी खासदार नारायण राणे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात बुधवारी ऐतिहासिक नाट्यप्रयोग आचरेकर प्रतिष्ठान सभागृह, कणकवली येथे शिवचरित्रावर आधारित विशेष नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. या नाट्यप्रयोगातून महाराजांचे पराक्रम, स्वराज्य स्थापनेची धडपड आणि त्यांच्या नेतृत्वगुणांचा प्रभावी आढावा रंगमंचावर साकारला जाणार आहे. तसेच गुरुवारी सांस्कृतिक अभिवादन होणार असून बॅ. नाथ पै सभागृह, सावंतवाडी येथे महाराजांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
---
पोवाडे, नृत्यनाट्य अन् बरेच काही
पोवाडे, नृत्यनाट्य आणि ऐतिहासिक सादरीकरणांद्वारे शिवचरित्र उजळवले जाणार आहे. दोन्ही कार्यक्रमांचा कालावधी सुमारे दोन ते अडीच तासांचा असून, प्रवेश विनामूल्य आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

ओला-उबर प्रवाशांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे चार नवे निर्देश; धोरणात मोठे बदल

Assam Congress Political Drama : निवडणुकीच्या आधी आसाम काँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोडी!, दिग्गज नेत्याने काही तासांत राजीनामा घेतला मागे...

Yoga For Stress: सततच्या ताणामुळे कॉर्टिसोल वाढतंय? 'ही' सोपी योगासने टेन्शनही करतील दूर अन् हृदयही ठेवतील निरोगी

Latest Marathi News Update : भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी

Severe Night Sweats: रात्री घामाने भिजता? ‘नाइट स्वेट’ची लक्षणे ओळखा, वेळेत घ्या उपचार!

SCROLL FOR NEXT